किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणं झालं सोपं; एसबीआयने आणली नवी सुविधा

26 September 2020 07:02 PM By: भरत भास्कर जाधव


देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी एक ऑफर आणली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे ते शेतकरी आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकतील, तेही घरी बसून. स्टेट बँकेने  आपल्या योनो कृषीवर किसान क्रेडिट कार्डवरील समीक्षा नावाची एक सुविधा सुरु केली आहे. याच्यामार्फत शेतकरी आपल्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू किंवा कमी करु शकतील. यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. एसबीआयकडून सांगण्यात आले आहे की, योनो कृषीवर केसीसीचा समीक्षा पर्याय निवडा. दरम्यान मर्यादा वाढविण्याची प्रक्रिया ही फक्त ४ क्लिकने पुर्ण करु शकता.

काय आहेत केसीसीच्या वैशिष्ट्ये

केसीसी खात्यात क्रेडिट बॅलन्सवर बचत खात्यावरील पैसावर व्याज मिळते. सर्व केसीसीधारकांना मोफत एटीएमसह डेबिट कार्ड दिले जाते.

तीन लाख रुपयांपर्यतचे कर्ज आपल्याला फक्त २ टक्के व्याजदराने मिळते. यासह प्रत्येक वर्षात यात सूट देखील दिली जाते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केले तर व्याजातून आपल्याला अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट मिळते.

सर्व  केसीसी कर्जासाठी अधिसूचित पीक किंवा अधिसूचित क्षेत्र, पीक विमाच्या अंतर्गत कवर केले जातात. पहिल्या वर्षाच्या कर्जाची रक्कम कृषी खर्च, कापणीनंतरचे खर्च आणि शेतीतील जमीन देखभाल खर्चाच्या आधारे ठरविली जाते.केसीसीच्या 60 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेसाठी दुय्यम सुरक्षा आवश्यक नाही.

kisan credit card sbi bank State bank of india KCC किसान क्रेडिट कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड एसबीआय बँक
English Summary: It is easy to increase the limit of Kisan Credit Card; SBI has introduced a new facility 26 sep

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.