1. बातम्या

ऐकावं ते नवलचं, वेताशिवाय 25 वर्षीय गाय देतेय दूध, कृषी तज्ज्ञांच्या उंचावल्या भुवया

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

लातुर : शेतीच्या व्यवसायासह शेतकरी दुग्धव्यवसायाचा जोडव्यवसाय करतात. जनावरांच्या लहान-मोठ्या आजारांपासून ते दुधवाढीपर्यंतच्या गोष्टींवर उपचार केले जातात. यामुळे शेतीच्या जोडव्यवसयात अमुलाग्र बदलही झाला आहे. याबाबतीत वेगवेगळे संशोधनही होत असले तरी लातुर जिल्ह्यात समोर आलेल्या प्रकारामुळे कृषी तज्ञही अवाक् झालेत. एकतर 25 वर्ष वयोवृध्द गाय वेताशिवाय ती दुध देते. औसा तालुक्यातील हिप्पसोगा येथे हा प्रकार घडला आहे.

लातुर जिल्ह्यातील औसा तालु्क्यातील हिप्परसोगा गावचे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते आणि माळकरी बालाजी सोमवंशी हे शेती बरोबरच दुग्ध व्यवसायही करतात. त्यांच्याकडे 25 वयोवर्ष असलेली ‘जानी’ नावाची गाय आहे. या गाईमुळेच सोमवंशी यांच्या दुग्ध व्यवसायाला उभारी मिळालेली होती.

आतापर्यंत पाच वेतं झालेल्या ‘जानी’नं प्रत्येक वेतानंतर 7 महिने एका वेळेला 3 लीटर दुध दिलं. पाच वर्षापूर्वी ही गाय माजावर आल्याने डॅाक्टरांकडून भरवंल गेलं पण गाय गाभण राहिली नव्हती. नंतर डॅाक्टरांना दाखवल्यानंतर या गायचे वय झाल्याने आता ही गाभण राहणार नाही, असे सांगितले होते. परंतु, पाच महिन्यापुर्वी अचानक गाय कास करू लागली. शेवटच्या तीन महिन्यात तर जास्तच कास केल्याने बालाजी यांनाही आश्चर्य वाटले.

 

डॅाक्टरांनी गायचे वय झालंय असं सांगितल्यापासून गाईला भरवलं नव्हतं. यानंतर सोमवंशी यांनी डॅाक्टरांनाच हा प्रकार सांगितला. तपासणी केली असता. गाय गाभण नाही पण सडात दुध साठले असल्याचे सांगितले. एके दिवशी सोमवंशी यांनी गायच्या पाय़ात सरा घालून धार काढली. पहिल्या दिवशी एक कप.. दुसऱ्या दिवशी एक ग्लास असे दुध दिवसेंदिवस वाढत गेले आहे. आता गेली चार महिन्यापासून ही गाय दीड लीटर दुध देत आहे. एवढेज नाही तर या दुधाचे दही, ताक आणि तूपही केल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. या प्रकारबद्दलची माहिती बालाजी सोमवंशी यांना पशुवैद्यकीय क्षेत्रतील तज्ञांना देखील दिलेली आहे. मात्र, याबाबत कुणाला काहीही सांगता आलेलं नाही. त्यामुळे यावर संशोधन होणं हे मोठं अव्हान असणार आहे.

पिंडाला शिवायचे काम कावळ्याचे पण ‘जानी’ ते करतेय

बालाजी सोमवंशी यांची शेती हा स्मशानभूमीला लागून आहे. चरण्यासाठी लांब कासऱ्याने या गाईला बंधाऱ्यावर बांधले जाते. स्मशानभूमीत अंत्यविधीनंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईक हे पूजा करून गेले तर ही गाय आरडाओरडा करते. अखेर स्मशानभूमीत जाऊन नैवद्य आणि वाहीलेले हार खाऊनच ती शांत होते. हे काम कावळ्याचे असते पण जानीच हे काम करते.

 

अन् ‘जानी’ च्या मायीनं जीव सोडला

सोमवंशी यांच्याकडील ‘जानी’ गाईचा जन्म झाला की दुसऱ्याच क्षणी तिच्या आईने जीव सोडला होता. त्यामुळे वरचे दुध पाजत सोमवंशी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे तिचा सांभाळ केला. त्यामुळे गाई कितीही वयोवृध्द झाली तरी विकायची नाही हे त्यांनी ठरविल्यानेच आजही जानी ही बालाजी यांच्याच दावणीला आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters