केंद्र सरकारने देशातील सर्व गरीब मजूर वर्गांसाठी एक महत्त्वाची योजना कार्यान्वित केली आहे. देशातील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी व सरकारद्वारे कार्यान्वित केल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा फायदा मिळावा या हेतूने ई-श्रम ही योजना अमलात आणली. रोजंदारीवर कामाला जाणारे श्रमिक, शेतमजूर, बांधकाम करणारे मजूर, भाजीपाला विक्रेते, घरकाम करणारे नौकर या सर्वांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड नामक योजना अमलात आणली आहे.
ई-श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेल्या असंघटित क्षेत्रातील श्रमिक लोकांसाठी उत्तर प्रदेश राज्यातुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील ई-श्रम पोर्टल अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व राज्यातील श्रमिकांना योगी सरकारने प्रत्येकी 1000 रुपये हस्तांतरित केले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यासाठी हा पहिला हप्ता पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. आता राज्यातील जनता पुढील हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशातील जवळपास 24 कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने दोन कोटी लोकांना प्रत्येकी हजार रुपये दिले आहेत. यूपीमध्ये डिसेंबर ते मार्च या दरम्यान ई-श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेल्या श्रमिकांना भत्ता दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबर ते मार्च यादरम्यान यूपी राज्यातील ई-श्रम कार्डधारकांना एकूण दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. एक हजार रुपये नुकतेच योगी सरकारने ई-श्रम कार्डधारकांना दिले आहेत, यूपीमध्ये सध्या आचारसंहिता लागू असल्याने राहिलेला पैसा हा मार्चनंतर मिळणार असल्याचे समजत आहे. यूपीमध्ये जवळपास सहा कोटी श्रमिक आहेत, त्यापैकी तीन कोटी 80 लाख प्रेमिकांनी ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे.
त्यापैकी दोन कोटींना या योजनेअंतर्गत योगी सरकारने लाभ दिला आहे, अजूनही 1 कोटी 80 लाख ई-श्रम कार्डधारक प्रतीक्षेत आहेत, लवकरच त्यांना देखील या योजनेअंतर्गत पैसा दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच राहिलेली रक्कम मार्च नंतर सर्वांना मिळणार असल्याचे सांगितले आहे.
योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेदेखील ई-श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेल्या श्रमिकांना आर्थिक साहाय्य दिले पाहिजे अशी श्रमिक वर्गाची मागणी आहे. यूपीमध्ये त्याची सुरुवात झाली आहे आता महाराष्ट्रात केव्हा होते हे विशेष बघण्यासारखे असेल.
Share your comments