आजचा दिवस सिनेसृष्टीसाठी काळा दिवस ठरला. आपल्या दमदार अभिनयाने लाखो रसिकाच्या मनात आपल्या स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खानने आज जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवासांपासून त्याची तब्येत खालावली होती, कोलोन इन्फेक्शनमुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता.
लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. इरफानच्या निधनांवर सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातील दिग्गजांनीही त्याला श्रध्दांजली वाहिली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील इरफान खान यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या इरफान विषयी आम्ही तुम्हाला न माहित असलेली गोष्ट सांगत आहोत. आपल्या अभिनयावर जीव ओतणाऱ्या इरफानला शेती करणे आवड होते. नाशिकमध्ये त्याचा फार्म हाऊस होता तेथे तो सेंद्रीय पद्धतीने शेती करायचा. त्याच्या शेती पद्धतीवर तो मोठ्या अभिमानाने बोलत असयाचा. आपल्या शेतात उभे रहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो, असे तो म्हणत असायचा. सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवण्यास त्याला आवडत. आपल्या खाली वेळेत तो सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवत होता. सेंद्रीय शेतीविषयी बोलताना तो नेहमी बोलायचा 'मी जे खातो ते माझ्या शरीराला अपायकारक आहे, यामुळे आपल्याकडे वेळ आहे तर आपण प्रत्येकाने आपले अन्न, भाजीपाला पिकवावा'.
सेंद्रीय शेती करण्याविषयी तो एक कारण सांगयाचा ''आता आपण खात असलेल्या भाजीपाल्यांवर, फळांवर रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा वापर अधिक असल्याने या अन्नाला कोणत्याच प्रकारची चव नाही. पण सेंद्रीय शेती पिकवलेली फळे आणि भाज्यां चवदार असतात. सेंद्रीय शेतीत पिकवलेले अन्न, फळे मला लहानपणी खालेल्या फळांची चव आठवणीत आणून देतात', असे तो म्हणायचा. रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा वापर करुन शेती करण म्हणजे निसर्गाला फसवण्यासारखे आहे, असं इरफान म्हणायचा. इरफान आपल्या शेतात आंबा, भेंडी, दुधी भोपळा, कारली, पालक आदीचे पीक घेत असायचा. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या मालाड घराशेजारी असलेल्या मॅनग्रोव्हच्या जंगलाच्या धापच्या विरोधातही निषेध नोंदविला होता.
Share your comments