सुबोध कुमार जयस्वाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Friday, 01 March 2019 07:46 AM


मुंबई:
राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. श्री. जयस्वाल हे भारतीय पोलीस सेवेच्या 1985च्या तुकडीचे अधिकारी असून ते या आधी मुंबई पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

पोलीस महासंचालनालयात आयोजित कार्यक्रमात यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त श्रीमती रश्मी शुक्लाअपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंहअपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदेविशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकरविशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सुबोध कुमार जयस्वाल Subodh Kumar Jaiswal पोलीस महासंचालक Maharashtra's Director General of Police

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.