Interim Budget 2024 LIVE : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी
Budget 2024 : ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असतात. तेव्हा त्याआधी जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्याला अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Budget 2024 : मोदी सरकारकडून आज (दि.१) रोजी देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. तसंच राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे तोंड देखील गोड केलं आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यंदा सहाव्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असतात. तेव्हा त्याआधी जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्याला अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत पोहचल्या आहेत. त्यामुळे काही वेळातच संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. सुमारे एक तासानंतर म्हणजे सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देतील.
English Summary: Interim Budget 2024 LIVE Finance Minister met the President before presenting the budget Approval of the budget by the PresidentPublished on: 01 February 2024, 10:57 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments