1. बातम्या

'अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो, कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?'

सध्या पुणे जिल्ह्यात कॅनॉलचे अस्थिरीकरणाचा विषय चांगलाच पेटला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. कॅनॉलचे अस्थिरीकरणाला शेतकऱ्यांचा चांगलाच विरोध होत आहे. यावर आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
raju shetty

raju shetty

सध्या पुणे जिल्ह्यात कॅनॉलचे अस्थिरीकरणाचा विषय चांगलाच पेटला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. कॅनॉलचे अस्थिरीकरणाला शेतकऱ्यांचा चांगलाच विरोध होत आहे. यावर आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राजू शेट्टी यांनी देखील याला विरोध केला आहे. कॅनॉलचे अस्थिरीकरण गरजेचे होते तर 15 वर्ष सरकार होत तेव्हा का केलं नाही? अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो. तो का असतो हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, इंग्रजांनी ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात कॅनॉलने पाणी नेले. कॅनॉलच्या आसपासच्या शेतीला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. कॅनॉल हा उंचावर असतो. आता धरणे फुटत आहेत. फुटण्याच कारण सांगितले जात की खेकडयाने धरण फोडले.

मोठी बातमी! दूध संघावर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, महाजन गटाला मोठा धक्का..

तसेच शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग कोणी केला हे आम्हाला चांगले माहिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा कालवा चालू आहे. आत्ताच हा कालवा तयार झाला, असं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जे पाणी शेतकऱ्यांसाठी आरक्षित होतं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बिगर शेती करण्यासाठी वापर झाला आहे.

त्यानंतर शेतीला पाणी कमी पडल्यानंतर त्याचे खापर गळतीवर फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्रजाच्या काळात बांधलेले कालवे उत्तम प्रतीचे आहेत.मात्र अलीकडच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जे कालवे बांधलेत, त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे, असेही ते म्हणाले.

Sugar Production; देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या, साखरेचं उत्पादन कमी करा..

तसेच ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने FRP चे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली नाही. याबाबत न्यायालयात दाद मागितली. कारखानदार भामटे आहेत, चोर आहेत. यामुळे पुढील गळीत हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
LIC ची जबरदस्त स्कीम, 122 रुपयांची बचत करून तुम्हाला मिळणार 26 लाख, जाणून घ्या..
कृषी अधिकारी असल्याचे सांगून खत विक्रेत्यांकडे पैशांची मागणी, अनेक तक्रारी दाखल..

English Summary: interested in getting tenders, destabilization of the canal not done after 15 years in power?' Published on: 31 August 2022, 10:22 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters