राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार

10 September 2019 09:08 AM


मुंबई:
राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा नदी खोऱ्यांचा एकात्मिक जलआराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नदी खोऱ्यांमध्ये, नदी खोरे अभिकरणांचे गठण करण्यात येईल. जलसंपदा विकास व व्यवस्थापन धोरण आखण्यात येईल. सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे दूषित पाण्याचे शुद्धीकरण केले जाईल. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले जाईल. भूगर्भीय सपाट खोऱ्यात खोल जमिनीसाठी ड्रेनेज तयार केले जाईल, पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामध्ये लाभधारकांना सहभागी करून प्रशिक्षण दिले जाईल. गाळपेर क्षेत्राचा बृहत आराखडा तयार केला जाईल.

शासनाने ‘व्हिजन 2030 डॉक्युमेंट’ नीती आयोगाकडे सादर केले आहे. याच्याशी सुसंगत प्रारूप आराखड्यातील शिफारशी टप्प्याटप्प्याने सन 2019 ते 2030 या कालावधीत विभागाकडून राबविल्या जातील, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

एकात्मिक राज्य जल आराखडा Integrated State Water Plan girish mahajan गिरीष महाजन नीती आयोग niti aayog
English Summary: Integrated water plan for the Maharashtra state is ready

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.