1. बातम्या

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करा - कृषि अधिकारीचे आवाहन

बुलडाणा : जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पावसानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पीक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

बुलडाणा : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पावसानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पीक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ज्या शेतक-यांनी जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आहे. अशा सोयाबीन पिकांवरसुद्धा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडींच्या प्रादुर्भावांची  शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधूंनी जागरूक राहून किडीचे व्यवस्थापन करावे.

किडींची ओळख व नुकसान:

खोडमाशी लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंड्यातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडांचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतिल भाग पोखरुन खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते. मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशी अळी तसेच कोष फांद्यात,खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. शेंगातील दाण्याचे वजन कमी हाकवून उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

 

चक्रीभुंगा -

या किडीची मादी पानाच्या टेठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारण: 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्याध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देठ आणी फांदीतुन आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडींचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारण: दिड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही. पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात, परिणामी उत्पादनात घट येते. पिवळे चिकट सापळे लावून नियमीत माशांचा प्रादुर्भाव पाहणे (25/हे), खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने फांद्या यांचा आतील किडसह नायनाट करावा.

 

खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर ( सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणसाठी इथियॉन 50 टक्के 30 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिपोल 18.5 टक्के 3.0 मिली किंवा थायोमेथॅक्झॉम 12.6 टक्के + लँब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी टक्के 2.5 मिली यापैकी कोणतेही एक किटकाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Integrated management of soybean khodmashi and chakribhunga Published on: 23 July 2021, 07:26 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters