1. बातम्या

Agriculture News: अमरवेलीचे एकात्मिक व्यवस्थापन!

अमरवेल हे परोपजीवी तण असून अन्न तयार करण्यासाठी आणि त्यांचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी इतर पिकांवर अवलंबून असतात. अमरवेल पिकांवर किंवा झाडांवर अवांछितपणे वाढून नुकसान करते. अमरवेलीचा प्रादुर्भाव दाळवर्गीय पिकांवर तसेच जवस, मिरची, कांदा, गाजर, सूर्यफूल आदींवर दिसून आला आहे. अमरवेलीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने द्विदल वनस्पतींवर आढळून येतो. अमरवेल स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करन्यासाठी द्विदल तणाचा सुद्धा वापर करते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Amarvel

Amarvel

अनिकेत अंबादासराव पाटील, डॉ. जयंत देशमुख, डॉ. आदिनाथ पासलावर

प्रस्तावना -
अमरवेल हे परोपजीवी तण असून अन्न तयार करण्यासाठी आणि त्यांचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी इतर पिकांवर अवलंबून असतात. अमरवेल पिकांवर किंवा झाडांवर अवांछितपणे वाढून नुकसान करते. अमरवेलीचा प्रादुर्भाव दाळवर्गीय पिकांवर तसेच जवस, मिरची, कांदा, गाजर, सूर्यफूल आदींवर दिसून आला आहे. अमरवेलीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने द्विदल वनस्पतींवर आढळून येतो. अमरवेल स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करन्यासाठी द्विदल तणाचा सुद्धा वापर करते.

अमरवेलीचे वैशिष्ट्ये -
अमरवेलीचा प्रसार बियाणे आणि वनस्पतिजन्य प्रसाराद्वारे होतो. अमरवेल परोपजीवी वनस्पतीमध्ये वाढ झाल्यानंतर २५-३० दिवसांनी हलकी पिवळी किंवा पांढरी फुले गुच्छ धारण करतात. अमरवेलीच्या बिया खूपच लहान असतात. १००० बियांचे वजन सुमारे ०.७०-०.८० ग्रॅम असते.

बियांचा रंग - तपकिरी किंवा हलका पिवळसर असतो.
अमरवेल जमिनीवर फुलांच्या परोपजीवी वनस्पतीप्रमाणे वाढते आणि नंतर वेलींप्रमाणे वाढून यजमान पिकांच्या वरचा भाग व्यापते. नंतर, ती पिकांवर अवांछितपणे पसरून पीक उत्पादनाचे नुकसान करते. अमरवेल यजमान पिकांचे पोषकद्रव्ये शोषून घेऊन, पिकांवरच स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करतात. त्यामुळे पिके कमकुवत होतात आणि पीक उत्पादनाची हानी होते. त्यामुळे अमरवेलीचे वेळीच व्यस्थापण करणे गरजेचे आहे. सध्यस्थीतीत अमरवेल नियंत्रित करण्यासाठी विविध व्यवस्थापन पर्याय उपलब्ध आहेत. तथापि, अमरवेल व्यवस्थापनासाठी बहुआयामी एकात्मिक दृष्टीकोन अत्यावश्यक आहे ज्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय, यांत्रिक उपाय आणि रासायनिक नियंत्रण पद्धतींचा समावेश आहे.

अमरवेल व्यवस्थापन - प्रतिबंधात्मक उपाय
प्रतिबंधात्मक उपाय -
१. पीक जातीची निवड -
पेरणीसाठी प्रतिरोधक पिकांच्या वाणांची निवड करावी. मका, गहू आदि यजमान नसलेल्या पिकांची लागवड करावी.
२. अमरवेल विरहित पीक बियानांचा वापर करावा
शेतीची उपकरणे अमरवेलीने प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी नेण्यापूर्वी काळजीने स्वच्छ करावी.
३. जांभूळवाही
उगवण अवस्थेतील अमरवेल तण जांभूळवाही देऊन नष्ट करावी.
अमरवेलीचा प्रादुर्भाव जर नमूद क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात असेल तर अमरवेल ताबडतोब हाताने काढून तातडीने जाळून नष्ट करावी.
४. प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करणे
अमरवेलीने प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी अमरवेलीचा प्रसार अथवा बीज प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करावा.
५. अमरवेलिने प्रादुर्भावीत झालेल्या शेती क्षेत्राची वारंवार पाहणी करावी.

६. पीकांची योग्य फेरपालट -
अमरवेलीचा वारंवार प्रादुर्भाव होत असेल तर पीकांची फेरपालट करणे योग्य राहील. पीक लागवडीमदध्ये तृणधान्य वर्गीय पिकांचा अधिक समावेश करावा उदा. मका, गहू, आदि पिके.
७. सुधारित पीक व्यवस्थापन पध्दतीचा परिणाम -
अमरवेलीवर सावलीचा खोल परिणाम होतो. परिणामी, सुधारित पीक व्यवस्थापनाच्या पध्दतीमुळे अमरवेल प्रतिबंधित होईल व पीक विकासास प्रोत्साहन मिळेल.
८. अमरवेल फुलोरा येण्यापूर्वी कापून टाकावे -
अमरवेलीचा प्रादुर्भाव झालेला शेती क्षेत्रामधील अमरवेल फुलोरा येण्यापूर्वी कापून टाकावे, जेणेकरून त्याचे बियाणे तयार होत नाही आणि पुढील पिकात त्याची समस्या कमी होते.
९. मुख्य पीक तणविरहीत ठेवणे -
मुख्य पीक तणविरहीत डवरणी व खुरपणी करून ठेवावे
१०. विलंबित सिंचन -
विलंबित सिंचनामुळे अमरवेल नियंत्रणात राहन्याचा कालावधी वाढू शकतो. मातीच्या पृष्ठभागावर आर्द्रता येईपर्यंत अमरवेलीचे बिजानणकुरण होत नाही

यांत्रिक नियंत्रण उपाय -
1. निवडक छाटणी -
वृक्षाच्छादित (लिंबूवर्गीय), आणि वनौषधी दोन्हीमध्ये काळजीपूर्वक निवडक छाटणीचा फायदा होऊ शकतो.
2. खोल नांगरणी -
खोल नांगरणीमुळे अमरवेलीचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी होतो.
3. मशागत तंत्र पद्धती मध्ये फेरपालट -
खोल नांगरणी आणि त्यानंतर प्रत्येक पर्यायी हंगामात किमान कमीत कमी मशागतिचा अवलंब केल्यास बियाणे पसरण्याची शक्यता कमी होते.

 

अमरवेल - यांत्रिक नियंत्रण उपाय
रासायनिक नियंत्रण उपाय -
विविध कृषि संशोधनाअंती मिळालेले परिणाम -
उगवण पूर्व तणनाशके -
• पेंडिमेथालिन या उगवण पूर्व तणनाशकाचा वापर प्रामुख्याने हरभरा पिकात करता येतो.
• पेंडिमेथालिन हे सामान्यतः उगवण पूर्व फवारली जाणारे पीक निवडक तणनाशक आहे जे फक्त काहीच पिकांमध्ये अमरवेल नियंत्रणासाठी वापरली जाऊ शकतात.
• पेंडीमेथालिन ०.५-१.५ किलो / हेक्टर उगवण पूर्व फवारणीमूळे हरभरा व उडीद पिकामध्ये अमरवेल नियंत्रणांत काही प्रमाणात फायदा झाला.

बांधावर फवारणीसाठी उपलब्ध असलेली गैर-निवडक तणनाशके - (जी पिके लागवडीखाली नसलेल्या क्षेत्रातच वापरता येतात)
• पॅराक्वॅट तणनाशक सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्वात सामान्य गैर-निवडक तणनाशके आहे म्हणून ही तणनाशके लागवडीखाली पिके असल्यास वापरली जाऊ शकत नाहीत.
• पॅराक्वॅट हे संपर्क तणनाशक असून वनस्पतींच्या ऊतींमध्ये जात नसल्यामुळे, निर्मूलनासाठी उत्तम फवारणी आवश्यक असते.

निष्कर्ष -
• अमरवेल ही एक परोपजीवी तण वनस्पती आहे
• अमरवेल तणाचे यशस्वी व्यवस्थापन करणे खूप आव्हानात्मक असून, प्रतिबंधात्मक, यांत्रिक नियंत्रण आणि तणनाशक नियंत्रण उपायांचा समावेश असलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून शेतातील पिकांमध्ये अमरवेलीवर नियंत्रण शक्य आहे.
• पीक लागवडीखाली नसलेल्या भागात गैर-निवडक तणनाशके जसे की पॅराक्वॅट प्रभावीपणे वापरुन अमरवेलीवर नियंत्रण साधता येते.
• विस्तार संस्थांनी देशभरातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अमरवेलीच्या च्या एकात्मिक व्यवस्थापनाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले पाहिजे.

लेखक - श्री. अनिकेत अंबादासराव पाटील पी.एच.डी. विद्यार्थी, कृषीविद्या विभाग, पदव्युत्तर शिक्षण संस्था, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला-४४४१०४ ईमेल: agronomistaniketpatil@gmail.com
डॉ. जयंत देशमुख मुख्य कृषिविद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला-४४४१०४
डॉ. आदिनाथ पासलावर विभाग प्रमुख, कृषी विद्या विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला- ४४४१०४.

English Summary: Integrated Management of Amarveli! Published on: 26 October 2023, 05:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters