राज्यातील खरीप पिकांची नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी अदा केली मात्र अद्यापही विमा कंपन्यांनी फळबागायती मालकांची नुकसान भरपाई अदाकेलेले नाही.ज्याफळ बागायतदारांनी नुकसान भरपाईपोटी पैसे अदा केले आहेत अशा एकाही शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही.
यामध्ये विशेष म्हणजे कृषी विभागाने पिक विमा कंपन्यांचे दावे मंजूर करून भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदाकरण्याबाबत लेखी सूचना करूनही त्यांचे पालन करण्यात आले नाही.
फळबागांचा हवामानावर आधारित विमा उतरवला जातो. यामध्ये राज्यातील जवळजवळ एक लाख तीन हजार 228 शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित झाले आहे. ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच देणे बंधनकारक होते मात्र विमा कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष करून अद्याप कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिलेली नाही.
त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने याबाबतीत केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे. राज्यातील जवळजवळ एक लाख तीन हजार 640 फळ बागायतदारांनी संबंधित सर्व नियमांचे पालन करून दावे दाखल केले, त्यासोबतच कृषी विभागाने हे दावे मंजूर करून नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे सादर करून रक्कम अदा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.मात्र अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई फळ बागायतदारांना मिळालेले नाही.
त्यामध्ये विमा कंपनी हे नुकसानच झाले नसल्याचे कारण देत विमा दावे नाकारत आहे.त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामध्ये विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी 426 कोटी 54 लाख अदा केले आहेत. केंद्र सरकारने 160 कोटी तर राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचे 158 कोटी 87 लाख आणि शेतकऱ्यांचे 107 कोटी जमा आहेत. सर्व विभागाचे पैसे देऊनही विमा कंपन्यांनी पैसे अदा करण्याची मानसिकता दाखवलेली नाही.
Share your comments