अमरावती जिल्ह्यात तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश
मुंबई: अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. श्री. पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
मुंबई: अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. श्री. पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी.
राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील ‘नाफेड’ची बैठक लवकरच घेण्यात येईल. हरभरा खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून राज्यात लवकरच त्याची खरेदी सुरु होईल, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.
यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, नाफेड मुंबई ब्रँच मॅनेजर पुनीत सिंग, मार्केटींग फेडरेशनचे नागपूरचे संजय निचल, पणन विभागाचे अवर सचिव श्रीमती सुनंदा घड्याळे आदी उपस्थित होते.
English Summary: Instructions to start pigeon pea and chick pea procurement Center in Amravati DistrictPublished on: 15 February 2020, 12:11 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments