व्यवसाय कोणताही असो पण त्यामध्ये आपल्याला आवड पाहिजे म्हणजे तो अगदी सहजपणे यशस्वी होतो मात्र जर त्यामध्ये आवडच नसेल तर काहीच साध्य होऊ शकत नाही. आज आपण एका असेच महिलेब्धल जाणून घेणार आहोत ज्यांना कृषी क्षेत्राशी एवढे ज्ञान आहे की त्यांना पद्यश्री पुरस्कार दिला आहे. राहीबाई सोमा पोपरे असे या महिलेचे नाव असून त्या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात राहतात. आज पूर्ण देश त्यांना बीजमाता म्हणून ओळखतात.राहीबाई यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी याकडे पाहून आपल्याला लक्षात येते. त्या अनेक शेतकऱ्यानं बीज उत्पादन तसेच त्याचे संगोपन याबद्धल महत्व सांगतात जो की याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे.
राहीबाई शाळेची पायरीच चढल्या नाहीत:-
राहीबाई कधीच शाळेची पायरी चढल्या नाहीत तरी सुद्धा त्यांनी गावरान बियाणे वाचवण्याचे काम केले असून इतर लोकांना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले आहे. शास्त्रज्ञ वर्गाने सुद्धा त्यांच्या ज्ञानाबद्धल कौतुक केले आहे.राहीबाई यांनी गावरान बियांची बँक तयार केली आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होत आहे. एकदा त्यांचा नातू संक्रमित भाज्या खाल्याने आजारी पडला तेव्हापासून त्यांनी गावरान बियांकडे लक्ष दिले व हळूहळू त्यांनी लक्ष देणे सुरू केले व एक आवड निर्माण झाली.
गौरव नारीशक्तीचा, सन्मान महाराष्ट्राचा:-
आजकाल जो तो उत्पादन वाढवण्याच्या मागे पडला असल्याने संक्रमित बियानावर भर देत आहे त्यामुळे देशी बियाणे काळाच्या ओघात लोप पावत आहेत परंतु महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात देशी बियांनाना मोठी मागणी आहे आणि हीच मागणी राहीबाई पूर्ण करत आहेत. राहीबाई सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन करत असतात. राहीबाई याना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच १०० शक्तिशाली महिलांमध्ये समावेश केले आहे.
स्वदेशी बियाण्यांची लोकांना जाणीव करून दिली:-
गावरान बियानाचे जतन व्हावे म्हणून राहीबाई यांनी अनेक राज्यांना भेट दिलेली आहे. त्यांनी देशी बियांबद्धल जागरूकता निर्माण केली आहे तसेच लोकांना सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले आहेत. राहीबाई यांनी त्यांच्या दोन एकर पडीक जमिनीत भाज्यांची लागवड करून पैसे कमवण्यास सुरू केले आहे.
Share your comments