महाड
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा पाहणी केली आहे. या गावात मागील काही दिवसांपूर्वी दरड कोसळल्याची घटना घडली होती. यावेळी सरकार इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले होते.
सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. सरकारकडून पुरवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ जेवण देण्यात येत आहे. तसंच आरोग्यसाठी वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान अशा विविध सोई रहिवाशांसाठी करण्यात आल्या आहेत.
या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. यावेळी मु्ख्यमंत्री शिंदे यांनी येथिल रहिवासी असणारे रामा पारधी यांच्या घरामध्ये जाऊन पाहणी देखील केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या निवारा केंद्राची पाहणी केली आहे.यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच नागरिकांना काही अडचणी, समस्या आहेत का याचा आढावा देखील घेतला आहे.
Share your comments