परभणी : जिल्ह्याच्या पूर्णा शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती व मोंढा भागातील कृषि दुकान केंद्राची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भरारी पथकातील कृषि अधिकाऱ्यांन कसून तपासण्या केल्या. सध्या मृगनक्षाच्या सरी कोसळताच शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी बियाणे व रसायनिक खतांच्या खरेदीसाठी कृषी केंद्राकडे धावपळ सुरु झाली असून त्या अनुषंगाने येथील परवानाधारक कृषि केंद्र चालकाकडून वाजवी किंमती पेक्षा चढ्या दराने बियाणे व खतांची विक्री होतेय का? विविध पिकांच्या वाणाचे बियाणे तसेच विविध कंपनीच्या खताचे आवक जावक रजिस्टर नोंदी, ओरिजनल बिल बूक अशा खरेदी विक्रीच्या दस्तऐवजांची जिल्हास्तरीय कृषि अधिकारी डि टी सामाले,एस पी बलसेटवार,जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जि बी ऐतलवाड तर तालूकास्तरीय कृषि अधिकारी संतोष भालेराव,पंचायत समिती कृषि अधिकारी जि बी दहिवडे यांनी तपासणी केली.
यावेळी कृषि केंद्र चालक दुकानदारांना तपासणीत आढळून आलेल्या त्रुटीची येत्या तीन दिवसात पूर्तता नाही केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. शिवाय चालू खरीप हंगामात बि बियाणे रासायनीक खताची शेतक-यांनी अधिक दराने विक्री केल्यास कृषि निविष्ठा विक्री परवाण्यावर बियाणे कायदा व खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असीही कृषि केंद्र चालकांना सुचित करण्यात आले.
दरम्यान, तसेच शेतक-यांनी कापूस बियाण्याच्या एकाच वाणाची आणि एकाच रासायनीक खताचा आग्रह धरण्यात येवू नये, जादा दराने खरेदी करु नये असे अवाहन कृषि सदरील भरारी पथकातील कृषि अधिकऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
Share your comments