शेतकरी आपल्या शेतीमध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. विशेषता भाजीपाला पिकांसाठी कीटकनाशकांची गरज पडते. मात्र कित्येकदा शेतकऱ्यांची बनावट कीटकनाशकांमधून फसवणूक केली जाते.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला (Grapes and vegetables) ही पिके मुख्य आहेत. या ठिकाणातील दिलासादायक बातमी म्हणजे येथील बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आसल्याची माहिती समोर आली आहे.
आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडुन दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन ॲप्लिकेशन प्रा. लि. यांच्या आवरात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे याठिकाणी तात्काळ कारवाई करण्यात आली.
अधिकृत किटकनाशके विक्रेते यांचे व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता.
आजचा दिवस वाया घालवू नका, संधीचं सोनं करा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
बनावट 295 किलो/लिटरचा साठा जप्त
कृषी विभागाने नाशिकमध्ये सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे, तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेंद्र पानपाटील (विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक) यांच्या सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली.
आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर; 'या' दिवशी रक्कम जमा होणार
जिल्हा भरारी पथकाने बनावट किटकनाशकाचा सुमारे 295 किलो/लिटरचा साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे रु. 6.16 लाख एवढे आहे. कारवाईच्या वेळी कृषी अधिकारी प.समिती दिंडोरी श्री.दिपक साबळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते.
संशयीत दिपक मोहन अग्रवाल यांच्या विरुद्ध किटकनाशक कायदा 1968, किटकनाशक नियम 1971, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत अभिजीत घुमरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी पोलिस ठाणे दिंडोरी येथे फिर्याद दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! सर्दी खोकला असू शकतो 'या' आजाराची लक्षणे
शेतकरी मित्रांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
पावसाचा धुमाकूळ; पालघर जिल्ह्यातील तब्बल 75 हजार हेक्टर शेती संकटात, शेतकरी चिंतेत
Share your comments