कृषी क्षेत्रातील नवसंशोधन ही काळाची गरज

17 November 2018 08:17 AM


नवी दिल्ली:
जगभरातील देश हवामान बदलाच्या समस्येला तोंड देत असून कृषी क्षेत्रातील नवसंशोधन ही काळाची गरज आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु म्हणाले. नवी दिल्लीत कृषी स्टार्ट-अप्स द्वारा संशोधन यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार समारंभात बोलत होते.

जागतिक लोकसंख्या वाढत असल्यामुळे पुढील काही वर्षात अन्नधान्याची मागणी वाढेल आणि यासाठी मर्यादित सुपीक जमिनीत आणि कमी पाण्याचा वापर करत अन्नधान्याचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी कृषी स्टार्टअप्सची गरज आहे असे ते म्हणाले. वाणिज्य मंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रात स्टार्ट-अप्ससाठी अमाप संधी आहेत ज्या आता प्रामुख्याने विचार मंच आणि निर्मितीपर्यंत सीमित आहेत.

सुरेश प्रभु यांनी कृषी स्टार्ट-अप्सना अधिक नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले. सरकार स्टार्ट-अप्सच्या विकासासाठी सुविधा पुरवण्यासाठी एका व्यापक धोरणावर काम करत आहे. सुरेश प्रभु यांनी विविध श्रेणीतील कृषि स्टार्ट-अप्सना नवोन्मेष पुरस्कार प्रदान केले.

 

suresh prabhu सुरेश प्रभु कृषी स्टार्ट-अप्स agriculture startups
English Summary: Innovation in Agriculture sector is future need

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.