श्रीलंका हा देश आपल्या शेजारील अभूतपूर्व अशा आर्थिक टंचाई आणि महागाई तून जात आहे. आज श्रीलंकेमध्ये एवढी भयानक परिस्थिती आहेकी विचार सुद्धा करवत नाही.
श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे.कोरोना पासूनपर्यटन उद्योग बंद पडल्याने त्याचा परिणाम आर्थिक टंचाईच्या स्वरूपात जनतेला आणि देशाला भोगावे लागत आहे.
काय आहे आज श्रीलंकेतील परिस्थिती?
जर या देशाचा आजच्या महागाई दराचा विचार केला तरसतरा टक्क्यांपर्यंत महागाईचा दर पोहोचला आहे.या देशातील नागरिक पेट्रोल,स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेल खरेदी करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहत आहेत. बरेच लोकया रांगेतच मृत्युमुखी पडत आहेत.एवढी भयावह परिस्थिती या देशात झाली आहे.ज्या कुटुंबामध्ये काही 1 ते 2 जणांना रोजगार उपलब्ध होते ते सुद्धा हातचे गेले असून वयस्कर व्यक्तींना अक्षरशःऔषधासाठी देखील पैसे उपलब्ध नाहीत.
बाजारात देखील औषधांचा तुटवडा असूनजर काही औषधे उपलब्ध असले तर ते दुप्पट तिप्पट किमतीने विकत घ्यावी लागत आहेत. पाई पाई रुपये गोळा करून केलेली बचत देखील संपली आहे व अनेक तरुण मुलांच्या नोकर्या गेल्या आहेत. प्रत्येक वस्तूंचे भाव चौपट पाचपट वाढले आहेत. एक कप चहा पिने देखील येथे परवडेनासे झाले आहे. अन्नधान्याच्या किमती तर गगनाला पोहोचले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अर्धा किलो दूध पावडर 800 रुपयांना मिळत आहे. यावरून अंदाज बांधता येईल की तिथली परिस्थिती आज काय असेल.
ही परिस्थिती मागे काय आहेत कारणे?
श्रीलंकेत काही काळापासून सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे ही स्थिती आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.श्रीलंकेची सत्ताही मोजक्या राजकीय घराण्याच्या हातातएकवटले असून अर्थव्यवस्था देखील याच राजकारण्यांच्या हातात एकवटलेली आहे.स्थानिकांच्या मते भ्रष्टाचार व राजकीय घराणेशाही यामुळे देशफार संपत चालला आहे.जर रुपयाच्या मूल्यांचा विचार केला तर आपल्याकडील एक रुपयाचे मूल्य श्रीलंकेत तब्बल तीन रुपये 81 पैसे इतके आहे.या पैशाचे मूल्य कमी झाल्याने भाज्या,दूध, अन्नधान्य प्रचंड प्रमाणात महाग झाली असून दररोज पोट भरणे देखील मुश्कील झाले आहे.
नागरिकांच्या मनात सरकार विषयी असंतोष वाढत असून सरकारच्या विरोधात बोलणार्या वर कारवाई करण्याचे काम श्रीलंका सरकारतर्फे मात्र करण्यात येत आहे.नागरिकांचे तासन्तास रांगेत उभे राहण्यात खर्च पडत आहेत.याविरोधात सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने होत असून सरकार विरोधात राग वाढत चालला आहे.
Share your comments