1. बातम्या

महागाई गगनाला भिडली, ब्रेड 130 रुपये आणि पेट्रोल 254 रुपये लिटर..

शेजारील देशांमध्ये वाढत्या महागाईमुळे लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे कठीण होत आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. वास्तविक, श्रीलंकेत लोकांना राहणे खूप कठीण झाले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
petrol

petrol

शेजारील देशांमध्ये वाढत्या महागाईमुळे लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे कठीण होत आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. वास्तविक, श्रीलंकेत लोकांना राहणे खूप कठीण झाले आहे. खाण्या-पिण्यापर्यंत पेट्रोलचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेत शुक्रवारपासून अनेक गरजू वस्तूंच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. यामुळे सगळी व्यवस्था कोलमडली आहे.

माहितीनुसार, केंद्रीय बँकेने श्रीलंकन ​​रुपयाचे (LKR) प्रति अमेरिकन डॉलर 230 रुपयांनी अवमूल्यन केले आहे. एका अहवालानुसार, ऑल सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनने ब्रेड पॅकेटची किंमत सुमारे 30 LKR ने वाढवली आहे. म्हणजेच, आता श्रीलंकेच्या बाजारात नवीन ब्रेडची किंमत 110 ते 130 श्रीलंकन ​​रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी गहू आयातक Prima ने देखील श्रीलंकेतील गव्हाच्या पिठाच्या किमतीत सुमारे 35 LKR ने वाढ केली आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात फरक स्पष्टपणे दिसून येतो. देशातील सर्व मोठ्या कंपन्या आपल्या वस्तूंच्या किमती वाढवत असतानाच, देशातील दुसऱ्या क्रमांकाची किरकोळ इंधन वितरक लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही गुरुवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. असे सांगितले जात आहे की, श्रीलंकेत डिझेलमध्ये प्रति लीटर 75 LKR आणि पेट्रोलमध्ये 50 LKR प्रति लीटर वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे प्रवाशांच्या भाड्यात मोठी वाढ होणार असल्याचे तीनचाकी वाहन मालक आणि बसचालकांच्या संघटनेने सांगितले. किमान बस भाडे 30 ते 35 LKR दरम्यान निश्चित केले जाईल. या महागाईच्या काळात एकीकडे गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, श्रीलंकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (नागरी उड्डाण मंत्रालय) विमान तिकिटांच्या किमतीत 27 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. जेणेकरून श्रीलंकेला चीनच्या कर्जातून लवकर मुक्ती मिळू शकेल.

या महागाईमुळे श्रीलंकेतील सर्वसामान्यांना पोटाची खळगी भरणे कठीण झाले आहे. श्रीलंका देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची पातळी सातत्याने घसरत आहे आणि सततच्या महागाईचा फटका लोकांचे कंबरडे मोडत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल सुरु आहेत. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. आता येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलणार की अजून वाईट परिस्थिती होणार हे लवकरच समजेल.

English Summary: Inflation skyrocketed to Rs 130 per liter for bread and Rs 254 per liter for petrol. Published on: 14 March 2022, 10:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters