कोरोना संकटामुळे देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जेणेकरुन संसर्गाची साखळी तुटावी पण, या लॉकडाऊनचा फटका बळीराजालाही बसत आहे. लॉकडाऊन असल्याने बाजार समित्यांचा कारभार बंद झाला अनेक बाजार बंद झाल्याने शेतमाल शेतात पडून आहे. दुधाचे दर उतरु लागले आहेत, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यात आता खतांच्या किंमती वाढत असल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचा ठरणार असल्याची शक्यता आहे.
वातावरण सुरळीत जरी असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या मात्र कमी होत नाहीत. कधी गोण नसल्याने बाजारात कधी गहूची खरेदी थांबवते तर कधी गहूचे पैसे वेळेवर येत नाही. आता सरकारच्या निर्णयाने परत शेतकऱ्यांची अडचणी वाढणार आहे. कारण १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या डीएपी खातांची गोण आता १९०० रुपयांत मिळणार असल्याने आर्थिक गणित बिघडणार आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तवला, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लहरी होती. पण खतांची किंमत वाढू लागल्याने उत्पन्न खर्चात वाढ होणार असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. जाणकारांच्या मते, रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने उत्पन्न खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांची किंमती वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
शेती न परवडणारी बनली असल्याचं शेतकरी वर्ग सांगत आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वसन देत होते. पण सत्तेत आल्यानंतर मात्र वास्तविकता मात्र वेगळीच असल्याचं मत शेतकरी मांडत आहेत. शेतकरी आंदोलनाला पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला पण त्याकडे सरकार लक्ष देत नाही. आणि आत खतांची किंमत वाढवली आहे. डीएपी किलोच्या बॅगेची किंमत ५८ टक्क्यांना वाढविण्यात आली आहे.
१२०० रुपयात मिळणारी गोण आता १९०० रुपयांना मिळणार आहे. युरियानंतर शेतकरी डीएपी आणि एनपीके १२ ३२ १६ चा वापरतात. एनपीकेच्या दर वाढून १८०० रुपये एक बॅग झाली आहे.
Share your comments