1. बातम्या

राज्यात पाच ते सहा लाख टन उसाचे गाळप शिल्लक; कारखाने बंद होण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर 2021 ला सुरु झाला होता. उसाचा गाळप हंगाम गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. गाळप हंगाम सुरु असला तरी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.

Sugarcane

Sugarcane

ऊस गळीत हंगाम (Sugarcane crushing season) 15 ऑक्टोबर 2021 ला सुरु झाला होता. उसाचा गाळप हंगाम गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. गाळप हंगाम सुरु असला तरी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. उसाची तोड झाली नाही यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अतिरिक्त उसाचे गाळप करण्याचं मोठे आव्हान साखर कारखानदारां (Sugar manufacturer) पुढे आहे. राज्यात आत्ता पाच ते सहा लाख टन ऊस अद्याप शिल्लक आहे.

ऊस अद्याप शिल्लक असताना काही भागातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परावानगी घेतल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येणार आहे असे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : ब्रेकिंग: ...तर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ऊसाचे गाळप रखडले आहे. अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यंदा रज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. अतरिक्त उसाचा मुद्दा असल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा लांबणीवर जाणार आहेत.

साखर कारखान्याच्या संचालकांना गाळप बंद करण्यापूर्वी साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वीच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यासंबधात कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे.

English Summary: Inflammation of five to six lakh tons of sugarcane Published on: 28 February 2022, 03:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters