Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठीमागील साडेसाती काही हटेनाशी झाली आहे. कांदा आणि लसणाला मिळत असलेल्या कवडीमोल भावत शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यातच आता मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांची खरीप पिकांचे नुकसान केले आहे त्यातच आता भर म्हणून हातातोंडाला आलेल्या सोयाबीन (Soyabean) पिकावर किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
एकीकडे गुरांवर लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, तर दुसरीकडे पिकांवर किडींच्या (Pests on crops) आक्रमणामुळे पीक नष्ट होत आहे. असाच एक प्रकार राज्यातील परभणी जिल्ह्यातून समोर आला आहे.
आजकाल सोयाबीन पिकांवर यलो मोझॅक रोग (Yellow mosaic disease) आणि फॉल आर्मी वर्मचे आक्रमण वाढत आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचीही सरकारने दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मेष, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांनी करू नका हे काम; अन्यथा होईल मोठे नुकसान
शेतकऱ्यांचा सरकारवर आरोप
शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना किडीचा त्रास होत असल्याचे शेतकरी सांगतात.
परंतु, कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही मार्गदर्शन मिळालेले नाही. शेतकर्यांकडून औषध फवारणीसाठी जास्त पैसे खर्च होत आहेत.अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. शासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत.
खुशखबर! पेट्रोल-डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार; जाणून नवीनतम दर...
औषध फवारणीचा काही परिणाम नाही
जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात कीटकनाशकांची फवारणी न केल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. आता शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. पिकांवर औषध फवारणीचा कोणताही परिणाम होत नसल्याचे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून मार्गदर्शन व मदत मिळत नसल्याने सर्व शेतकरी निराश झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
सांगा शेती करायची कशी! कांद्यापाठोपाठ लसनाचीही दुर्दशा; बाजारात मिळतोय 5 रुपये किलो भाव
राज्यात पावसाचा जोर कमी! मात्र काही भागांत मुसळधार कोसळणार; यलो अलर्ट जारी
Share your comments