1. बातम्या

सोयाबीन व कपाशीवर पैसा व करडे भुंगेरे किडींचा प्रादुर्भाव

KJ Staff
KJ Staff


हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या थोडया बहुत पावसावर मराठवाड्यात कापूस व सोयाबीन पिकांची लागवड झाली, परंतु नंतर पावसाने उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर पैसा व करडे भुंगेरे या किडी कोवळ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान करत आहे.

पैसा (मिलीपेड):

हि जमिनीवर आढळणारी पिकांना सर्वात जास्त नुकसानकारक किड म्हणून ओळखली जाते. किड कपाशीचे बियाणे फस्त करुन फक्त टरफल शिल्लक ठेवते. त्यामुळे कपाशीची उगवण होत नाही व मोठया प्रमाणात शेता तुट दिसून येत आहे. त्याचबरोबर तुट लावल्या जागेवरचे बियाणेसुध्दा खाऊन टाकत आहेत. रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकतात. ही किड निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात. तसेच बांधावरील व शेतावरील तणांवरसुध्दा खातांना आढळून आली आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी या पुढील उपाययोजना कराव्यात.

पैसा किडींचे व्यवस्थापन:

शेतात व बांधावरील पैसा किड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. शेत तणविरहित ठेवावेत व शेतातील तसेच बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे. पिकामध्ये कोळपणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघड्या पडून नष्ट होतील. जमिनीतील किडींसाठी फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो/हेक्टरी जमिनीमध्ये टाकावे. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.

करडे भुंगेरे: 

करडया रंगाचे व तोंडाचा भाग सोंडे प्रमाणे पुढे आलेला असतो. साधारणता हि किड कमी महत्वाची असून दरवर्षी नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु कधीकधी किडींचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून येतो. हि किड पांनाना गोलाकार छिद्रे पाडतात व कोवळी रोपे खाऊन टाकतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस 36 एस एल 25 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावे. 

वरीलप्रमाणे उपाययोजना करुन या किडींचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कृषी किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. झंवर व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters