1. बातम्या

भारत चीनमधील तणाव वाढला; सैनिकांमध्ये चकमक भारताच्या कर्नलसह २ जवान शहीद


भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर तणाव वाढला असून  सोमवारी रात्री उशीरा गोळीबार झाला.  दोन्ही देशांमध्ये झालेल्या या फायरिंमध्ये भारताच्या कर्नलसह दोन आर्मी जवान शहीद झाले.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. भारत आणि चीन सीमेर दोन्ही देशांमध्ये फायरिंगची ५३ वर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. भारत आणि चीनमध्ये रोज अधिकारी स्तरीय चर्चा झाल्या. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर तणाव करण्यासाठी माघार घेण्यास तयार झाले. त्याच प्रक्रियेमध्ये जवान आपसात भिडल्याचे सांगितले जात आहे.

 या प्रकरणावर राजस्थानात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांसह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित आहेत.  रॉयटर्स वृत्तसंस्थेला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने एकतर्फी कारवाई करू नये. अन्यथा त्यांनाच त्रास होईल. गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने उलट भारतावरच चिनी हद्दीत प्रवेश केल्याचा आरोप केला आहे.

भारतीय लष्कराकडून यासंदर्भात अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘सोमवारी रात्री गालवान परिसरात डी-एस्कलेशन प्रक्रिया सुरू होती.   परंतु, याचवेळी अचानक हिंसाचार झाला. यामध्ये भारताच्या एका अधिकाऱ्यासोबतच दोन जवान शहीद झाले आहेत. सध्या दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावर चर्चा करत आहेत'.   थोड्याच वेळात आणखी एकदा भारतीय लष्कराने संवाद साधला. त्यामध्ये चीन सीमेवरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.  सोबतच या चकमकीत दोन्ही देशांचे जवान शहीद झाले असेही सांगण्यात आले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters