शेतकऱ्यांकडे अनेक घरगुती व्यवसाय असतात. त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. यामध्ये एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे देशी कोंबडी पालनाचा व्यवसाय. यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांना पैसे मिळणार आहेत. तसेच यासाठी जास्त वेळही लागणार नाही. यामुळे हा व्यवसाय फायदेशीर आहे. तसेच कष्ट देखील कमी आहे. यासाठी सकाळ संध्याकाळ फक्त एक तास काम करावे लागेल. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आपण चांगले पैसे कमवू शकतो. अनेकांनी १०० पिलांपासून व्यवसाय सुरु केला आहे. आता त्यांच्याकडे हजारांमध्ये पिल्ले आहेत. यामधून आपण लाखो रुपये कमवू शकतो. यामुळे कमी खर्चात हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे.
यामध्ये जर आपण देशी जातीच्या कोंबड्या खरेदी केल्या तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. आता त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. १०० बाय १२ फूट आकाराच्या शेडमध्ये किंवा आपल्या गरजेप्रमाणे पोल्ट्रीसाठी आवश्यक पाणी आणि यंत्रणेची उभारणी करावी. एक दिवसांच्या पिलांची चांगली वाढ व संगोपन करून सुमारे ९० दिवसांनंतर विक्री करण्यात येते. यामुळे तीन महिन्यामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळतात.
विक्रीच्या वेळी पक्ष्यांचे वजन सव्वा किलोपर्यंत असते. तसेच अनेकदा ते वाढते देखील. आपल्या योग्य नियोजनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ब्रॉयलर पक्ष्यांच्या तुलनेत देशी पक्ष्यांचे व्यवस्थापन तुलनेने सोपे आहे. तसेच पक्ष्यांना वजन आणि मांसवाढीसाठी कोणतीही 'हार्मोन्स'रूपी इंजेक्शने दिली नाहीत तरी त्यांची चांगली वाढ होते, तसेच मर रोगाचे प्रमाण देखील कमी असते. देशी कोंबड्यांचे परसबागेत चांगले पोषण होते. मुक्त विहारही त्यांना करू दिला जातो. यामध्ये धोका देशील नसतो. यामुळे जास्त प्रमाणावर खर्च देखील होत नाही.
तसेच त्यांना काही प्रमाणात हिरवा चारा दिला जातो. कांदापातीचे शेंडे आणि गवत हे खाद्य कोंबड्या आवडीने खातात. यामुळे बाहेरचे खाद्य मोठ्या प्रमाणावर लागत नाही. देशी कोंबड्यांना चिकन व्यावसायिक, हॉटेल चालकांकडून मागणी आहे. खरेदीदार पोल्ट्रीवर येऊन खरेदी करतात. अनेकजण देशी आहारासाठी केवळ हेच खातात. शेती आणि संसाराला त्याचा चांगलाच आधार होतो. यामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात तुम्ही चांगले पैसे कमववी शकता.
Share your comments