जगभरातील नागरिक भारताच्या डाळिंबाच्या चवीला पसंद देत आहेत जे की एकदा की डाळिंब खाल्ले की ग्राहक खुश होतात. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनमधून आकार आणि वजनाला ते आजही मागे आहे. स्पेनच्या पोमवंदर या डाळिंबाशी भारताच्या भगव्या वाणांची चांगलीच स्पर्धा लागलेली आहे. मात्र वजन व आकारामध्ये हे डाळिंब माघे पडत आहे.
जगातील सर्वात जास्त फलोत्पादन देणारा देश म्हणजे भारताकडे पाहिले जाते. तसेच भाजीपाला मध्ये भारताचा जगात १० टक्के पेक्षा जास्त वाटा आहे. मात्र निर्यातीमध्ये कमी वाटा आहे. जे की अवघे 2 टक्के डाळिंबाची निर्यात होते. भारतात डाळिंबाचे एकूण क्षेत्र २ लाख हे हेक्टरवर आहे मात्र कीड आणि रोगामुळे डाळिंबाचे उत्पादन घटत आहे. जे की सध्या यामुळे उत्पादन आणि क्षेत्रवाढ देखील घटलेली आहे.
म्हणून पोमवंडरला उठाव :-
भारतातही भगवा वाणाचे डाळिंब हे बाहेरचे देश म्हणजेच स्पेन, इराण, इराक, इस्राईल या देशाच्या डाळिंबाशी स्पर्धेत उतरले आहे. जे की स्पेन च्या पोमवंडर डाळिंब वाणाची तुलना भारताच्या भगव्या वाणाच्या डाळिंबाशी केली जात आहे. भारताचे भगवे वाण असणारे डाळिंब चवीला खूप गोड आहे आणि हा वाण खूप उत्कृष्ट मानला जातो. स्पेन चे पोमवंडर वाणाचे डाळिंब हे आंबट-गोड आहे तर भारताचा भगवा वाण हा चवीला खूपच गोड असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:-मोसंबी पिकासाठी आहे विमा योजना, मात्र ही कागदपत्रे आहेत आवश्यक
भारताच्या भगव्या वाणाची तुलना अन्य कोणत्याही बाबतीमध्ये केली तर जसे की वजन पाहायला गेले तर याचे वजन जास्तीत जास्त ४०० ते ५०० ग्रॅम एवढे भरते मात्र स्पेन चे पोमवंडर वाणाचे डाळिंब हे सुमारे ६०० ते ७०० ग्रॅम भरते. पोमवंडर वाण हा आकाराने मोठा आहे जे की भारताचा भगवा वाण हा आकरच्या दृष्टीने मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. भारताच्या भगव्या वाणाच्या डाळिंबाच्या सुमारे ४५ टक्के रस भेटतो तर पोमवंडर वाणामध्ये फक्त ५ टक्के रस अधिक आहे. जे की बाजारात अनेक वेळा पोमवंडर वाणाचा मोठया प्रमाणावर उठाव होतो.
Share your comments