केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, आण्विक उर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जैव अर्थव्यवस्था गेल्या 8 वर्षांत 8 पटींनी वाढली असून 2014 मध्ये 10 अब्ज डॉलर मूल्य असलेली ही अर्थव्यवस्था 2022 मध्ये 80 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
जम्मू येथे जैव विज्ञान आणि रासायनिक तंत्रज्ञान यामधील उदयोन्मुख कल -2022 या विषयावर आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेला डॉ. सिंह संबोधित करत होते. डॉ. सिंह म्हणाले की, गेल्या 8 वर्षांमध्ये जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्स तब्बल शंभर पटींनी वाढले असून 2014 मध्ये त्यांची संख्या 52 वरून 2022 मध्ये 5300 वर पोहचली आहे.
ते पुढे म्हणाले की, 2021मध्ये दररोज 3 जैव तंत्रज्ञान विषयक स्टार्ट अप्स स्थापन केले जात होते आणि एकट्या 2021मध्येच 1128 स्टार्ट अप्स स्थापन करण्यात आले. यावरून भारतातील हे क्षेत्र किती झपाट्याने वृद्धिंगत होत आहे, याचा अंदाज येतो.+
"नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यास खर्च कमी होतोच; शिवाय उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळतो"
2014 मध्ये केवळ 10 कोटी इतकी नाममात्र गुंतवणूक जैव अर्थव्यवस्थेत होती. तर 2022 मध्ये ती 40 पटींनी वाढून 4200 कोटी रूपयांपर्यंत गेली आहे. आणि त्यातून 25,000 अति-कुशल रोजगारांची निर्मिती झाली आहे., याकडे डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले.
जागतिक मंचावर भारतीय व्यावसायिकांचा वाढत्या प्रतिष्ठेच्या अनुषंगाने डॉ. सिंग म्हणाले की, जगभरात भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) व्यावसायिकांवरील विश्वास वृद्धिंगत होत असून या जैव अर्थव्यवस्थेच्या दशकात, भारताच्या जैव- व्यावसायिकांबाबतही तसे घडेल.
PM Kisan: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून 13व्या हप्त्याची तारीख केली निश्चित!
Share your comments