1. बातम्या

आता श्रीलंका देशात पाहायला भेटणार भारतातील दुग्धजन्य पदार्थ, सुमारे ३० वर्षानंतर उठवली आयात बंदी

श्रीलंका देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती चालू आहे. जे की देशात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत असल्यामुळे वस्तूंचे भाव खूप वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, गॅस, मेडिसिन आणि अन्नधान्याचा टंचाई देशात भासत आहे. वीज निर्मिती सुद्धा ठप्प झाली असल्यामुळे रोज लोडशेडिंग करण्यात आले आहे तसेच बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असल्याने पोलीस आणि नागरिकांच्या मध्ये वादविवाद वाढले आहेत. तर काही भागात संचारबंदी सुद्धा लावलेली आहे. अशी परिस्थिती चालू झाली असल्यामुळे श्रीलंका सरकार विदेशाची मदत घेत आहे. आपल्या देशाची देखील धोरणे बदलली आहेत आणि त्यात सुमारे ३० वर्षांनी श्रीलंका देशात भारताच्या दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
milk

milk

श्रीलंका देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती चालू आहे. जे की देशात जीवनावश्यक  वस्तूंची  टंचाई  भासत  असल्यामुळे वस्तूंचे भाव खूप  वाढले  आहेत. पेट्रोल,  डिझेल,  कोळसा, गॅस, मेडिसिन आणि अन्नधान्याचा टंचाई देशात भासत आहे. वीज निर्मिती सुद्धा ठप्प झाली असल्यामुळे रोज  लोडशेडिंग  करण्यात आले आहे तसेच बेरोजगारी सुद्धा  वाढलेली  आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असल्याने पोलीस आणि नागरिकांच्या मध्ये वादविवाद वाढले आहेत. तर काही भागात संचारबंदी सुद्धा  लावलेली  आहे. अशी परिस्थिती चालू झाली  असल्यामुळे  श्रीलंका सरकार विदेशाची मदत घेत आहे. आपल्या देशाची देखील धोरणे बदलली आहेत आणि त्यात सुमारे ३० वर्षांनी श्रीलंका देशात भारताच्या दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.भारताच्या डेअरी आर्थिक विकास बोर्डाने श्रीलंका देशात देश व्यवसायाची मोट बसवण्यासाठी मोठे सरकारी केले आहे असे एनडीडीबीचे अध्यक्ष मनीश शहा यांनी सांगितले. श्रीलंका देशात विरोध चालू असल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. फक्त सरकारच्या पातळीवर दुधाचे पदार्थाची निर्यात होऊ शकते.

सुमारे ३० वर्षांनी उठतेय बंदी :-

१९९० सालापासून श्रीलंका देशाने भारत देशातून दुग्धजन्य पदार्थाची आयात बंद केली होती. देशातील दूध व्यवसायांना आणि उद्योगाचे सरंक्षण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. भारत देशाला दुग्धजन्य घटकांना दूर करत  श्रीलंका  न्यूझलंड  व  ऑट्रेलिया देशातून दूध आयात  करत  होते. आजच्या  स्थितीला  श्रीलंकाचे दूध  मार्केट जवळपास ४० कोटी  डॉलरला आहे.देशातील सध्याची परिस्थिती पाहता श्रीलंका  भारतीय  दुग्धजन्य  पदार्थ आयात करू इच्छित आहेत. ही परिस्थिती भारतासाठी फायदेशीर आहे असे चितळे डेअरी चे  गिरीश  चितळे म्हणतात.

जीवनावश्यक वस्तूंचे हजारो रुपये भाव :-

श्रीलंका देशात तांदळाचा दर हा २०० ते २५० रुपये किलो वर पोहचलेला आहे तसेच सफरचंद हे १००० ते १२०० रुपये किलो. दूध पावडर चा दर हा १५०० ते २००० रुपये वर गेलेला आहे. देशातील ही टंचाई दूर करण्यासाठी श्रीलंका भारतीय दूध उत्पादने आयात करण्यासाठी धडपडत आहे. भारतामध्ये आधीच अतिरिक्त दूध पावडर तर आहेच त्यामुळे श्रीलंका ला दूध पावडर निर्यात करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

या परिस्थितीचा आपणास होणार फायदा :-

श्रीलंकेच्या या निर्णयामुळे भारताच्या उद्योगाला चांगला फायदा होणार आहे. आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये जर आपण  निर्यात  केली तर आपणास  फायदा  हा  होणार  आहेत. निर्यातीसाठी आपल्याला जवळचे मार्केट भेटत आहे. परंतु ही निर्यात टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंका देशाने योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत.

English Summary: India's ban on dairy products lifted after nearly 30 years Published on: 12 April 2022, 03:54 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters