सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोना स्थितीतून निघत असतानांच काही राज्यांमध्ये लावण्यात आलेल्या अंशिक लोकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागण्याची भीती आहे.
पण तरी चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 10.5 टक्के राहण्याचा अंदाज भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेलाहो तिच्या वाढीला हातभार लावण्याकरिता बँक कायमच तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर द्वैमासिक पतधोरणाची घोषणा शक्तीकांत दास यांनी केली. या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. या झालेल्या बैठकीमध्ये सर्व सहाही सदस्यांनी दर कायम राखणे ला मान्यता दिल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले. जर भविष्यात गरज भासलीच तर हे दर कमी केले जाते असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास न होता तिच्यात घट नोंदवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चालू वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 10.5 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 26.2, दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत अनुक्रमे 8.3, 5.4 आणि 6.2 टक्के वाढीचा दर राहण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या भारतातील काही राज्यांमध्ये अंशिक लोकडाऊनमुळे परिस्थिती बिघडू शकते हे स्पष्ट करतानाच यावर लवकरच मात करण्याची अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
Share your comments