1. बातम्या

व्याघ्रगणनेत भारताने गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले नाव; जाणून घ्या ! कसे

KJ Staff
KJ Staff


व्याघ्रगणनेत भारताने गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवले आहे. भारतातील वाघांची संख्या कमी कमी होत होती. त्यानंतर व्याघ्र संवर्धनामुळे नव्या वाघांची संख्या वाढते आहे. आपल्याकडे मध्यप्रदेश हे ‘वाघांचे राज्य’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा वाघांच्या संख्येत तिसरा क्रमांक लागतो. व्याघ्र वास्तव्यास असलेल्या देशांमध्ये भारतात ७० टक्के वाघ आहेत. या देशांनी स्थापन केलेल्या ‘ग्लोबल टायगर फोरम’ च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात येत आहेत. या चळवळीत भारत मुख्य भूमिका बजावतो आहे. 

  वाघांच्या संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्प स्तरावर आणि जनजागृतीसाठी काही चांगले उपक्रम प्रशासनाने राबविले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’ करून सरकारने शहरी नागरिकांना व्याघ्र मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्नही केला. याचाच परिणाम म्हणजे भारताने गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

भारताने २०१८ च्या व्याघ्र गणनेने  कॅमेरा टॅपिंगच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा वन्यजीव सर्व्हेक्षणचा किर्तीमान बनविण्यासाठी  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपली जागा बनवली आहे.  अखिल भारतीय वाघ अनुमान २०१८ च्या चौथ्या टप्प्यात देशात २ हजार ९६७  वाघ असतील. जगाच्या एकूण संख्येत ७५ टक्के इतकी संख्या वाघाची असेल असा अंदाज लावण्यात आला होता.

वाघांच्या आकड्यांशी तुलना केल्यास प्रत्येक वाघासाठी वर्षाला दहा लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी वापरण्यात येणारे कॅमेरा ट्रॅप, शिकाऱ्यांना रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर कोट्यवधी रुपये खर्च होतो आहे.

भारताने वाघाच्या संख्येप्रकरणी नवा जागतिक रेकॉर्ड बनवला आहे. देशात २०१८ मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत एक नाव विक्रम कायम केला. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वाघ दिवसाच्या निमित्त या परिणामांची घोषणा केली होती.

चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रिय सुचना आणि माहिती प्रसारण, आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यामुळे करण्यात आलेल्या सर्व्हेला गिनीज बूक ऑफ रिकॉर्डमध्ये जागा मिळाल्याचे जावडेकर म्हणाले.

करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, वाघांच्या सर्व्हेसाठी देशात २६ हजार ७६० जागांवर १३९ अभ्यास केला गेला. या दरम्यान साडेतीन कोटी पेक्षा जास्त फोटो घेण्यात आले. यात ७६ हजार ५२३ वाघांचे फोटो आणि ५१ हजार ३३७ बिबट्याचे फोटो होते.

हे सर्वेक्षण वर्ष २०१८ मध्ये करण्यात आले होते आणि मागील वर्षी हे जाहीर करण्यात आले होते, तर आता जागतिक विक्रम जाहीर झाला आहे. या सर्वेक्षणानुसार शावकांना वगळता देशात वाघांची संख्या २४६१  आहे आणि एकूण संख्या २९६७ आहे. २००६  साली वाघांची संख्या १४११  होती. त्यानंतर २०२२  पर्यंत भारताने ते दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. अहवालानुसार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये भारतात सर्वाधिक  १४९२  वाघ आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters