1. बातम्या

Cucumber Export: भारत ठरला काकडी चा सगळ्यात मोठा निर्यातदार देश

काकडी या पिकाची योग्य नियोजन करून व योग्य व्यवस्थापनाने लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळते. काकडे उत्पादनांमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा,जामनेर,यावल, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीच्या अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the cucumber

the cucumber

काकडी या पिकाची योग्य नियोजन करून व योग्य व्यवस्थापनाने लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळते. काकडे उत्पादनांमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील  पाचोरा,जामनेर,यावल, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीच्या अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

काकडीला उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मागणी असते.जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. याच काकडीच्या निर्यातीमध्ये भारत हा सगळ्यात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. या लेखात याबद्दल माहिती जाणून घेऊ.

भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा निर्यातदार देश…..

 भारत हा काकडी आणि खीरा याचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. जर एप्रिल आणि ऑक्टोबर(2020-21)या काळाचा विचार केला तर भारताने जगात काकडी आणि खीरा काकडी ची 1 लाख 23 हजार 846 मेट्रिक टन म्हणजेच 114 दशलक्ष डॉलरची निर्यात केली आहे.

भारताने मागच्या वर्षाच्या आर्थिक वर्षात कृषी प्रक्रिया उत्पादने, लोणच्यासाठी काकडी या पदार्थांच्या उत्पादनात 200 दशलक्ष डॉलर पेक्षा अधिक मूल्यांची निर्यात केली. जगभरात काकडी आणि लोणची काकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कृषिमालातदेशाच्या निर्यातीत वाढ झाली आहे.2020-21 या वर्षामध्ये भारताने 2 लाख 23 हजार 515 मेट्रिक टन काकडीची म्हणजेच 223 दशलक्ष डॉलर्स मुल्यांच्या काकडीचे निर्यात केली.

याबाबतीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या तयारीत असलेल्या वाणिज्य विभागाच्या निर्देशांकानुसार कृषी आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडानेपायाभूत विकास तसेच जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय अन्न प्रक्रिया केंद्रात अन्नसुरक्षा व्यवस्थापनाचा ही उपाययोजना करण्यात आले आहेत.

(स्त्रोत-इये मराठीचिये नगरी)

English Summary: india is number one in cucumber export in world know situation Published on: 25 January 2022, 10:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters