2030 पर्यंत भारत जपानलाही मागे टाकत आशिया खंडातील सर्वात दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. तसेच जीडीपी देखील जर्मनी आणि इंग्लंडला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनू शकेल, असे अनुमान आयएचएस मार्केट ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केले आहे.
कोरोना कालावधीमध्ये जगातील सगळ्यात अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या होत्या. या परिस्थितीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला देखील बसला होता. परंतु जगातील इतर अर्थव्यवस्था प्रमाणे भारताची अर्थव्यवस्था देखील सावरत असून गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर जीएसटी संकलन यामध्ये नवे उच्चांक गाठत आहे. भारतातील मध्यमवर्ग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा मध्यमवर्ग ग्राहकाच्या रूपात सेवा व उत्पादनावर खर्च करताना अर्थव्यवस्थेच्या विविध बाजूंना आणि घटकांना देखील चालना देत असतो.
त्यासंदर्भात देशाचा वस्तू व सेवा उपभोगा वरील खर्च सन 2020 मध्ये दीड लाख कोटी डॉलर होता.येणाऱ्या पुढील काळात तो म्हणजेच 2030 पर्यंत तीन लाख कोटी डॉलर पर्यंत वाढेल असा अंदाज बांधण्यात आला आहे.
भारताच्या जीडीपीची स्थिती….
भारताचा जीडीपी चा विचार केला तर 2021 मध्ये 2.7 लाख कोटी डॉलर वरून येणाऱ्या 2030 पर्यंत 8.4 लाख कोटी डॉलर पर्यंत वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या ज्या गतीने आर्थिक सुधारणा भारतामध्ये चालू आहेत त्याचा विचार केला तर 2030 पर्यंत जीडीपी जपान पेक्षा अधिक होईल व भारत हा आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
असा अंदाज आयएचएस मार्केटनेव्यक्त केला आहे. येणाऱ्या दशकात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील अशी अपेक्षा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. तसेच 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.7 टक्के वेगाने वाढेल असा देखील अंदाज आय एच एस मार्केटने त्यांच्या अहवालात व्यक्त केला आहे.
Share your comments