रशिया आणि युक्रेन मधील युद्धाचा आपल्यासह इतर देशांवर बरा-वाईट परिणाम पहायला मिळाला. तर भारतात काहीअंशी तेलासह इतर वस्तूंवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे ही दरवाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र ही दरवाढ देशातील शेतकरी आणि निर्यातदारांसह संबंधित घटकांना समाधान देणारी आहे.
तर कोरोनाकाळानंतर गव्हांशी संबंधित प्रथम दिलासादायक बातमी असल्याचे निर्यातदार सांगत आहेत. आपल्या देशात दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचा गहू उत्पादित होत असल्याने भविष्यात भारताचा गहू जगावर राज्य करेल असा अंदाज मुंबई बाजार समितीमधील गहू निर्यातदार देवेंद्र व्होरा यांनी व्यक्त केला आहे. सध्या भारतातून बाहेरच्या ५८ देशांमध्ये गव्हाची निर्यात होते.
सध्या रशिया आणि युक्रेन मधील गहू निर्यात नसल्याने देशाला याचा फायदाच झाल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकारकडून गेल्या तीन ते चार वर्षात गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जावी याकरिता प्रयत्न सुरु होते. शिवाय त्याचा फायदा मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून दिसत आहे. जगातील विविध देशांना रशियातून ७० लाख टन गहू निर्यात होतो. तर युक्रेन मधून २ दशलक्ष टन गहू निर्यात केला जातो.
सध्या युद्धजन्य परिस्थितीने त्या देशांमधील निर्यात थांबल्याचा फायदा भारताला होत आहे. तर गव्हाशी निगडित शेतकऱ्यांपासून सर्व घटकांना याचा फायदा होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांना सुद्धा गव्हाला 15 ते 40 रुपये अधिक बाजारभाव मिळू लागला आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकरी समाधानी आहे.
गेल्या वर्षी भारताने ४० दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली होती. यंदा सरकारचा अंदाजित आकडा 1 कोटी 10 लाख टन इतका आहे. शिवाय देशात या वर्षी थंडी चांगली पडल्याने गव्हाच्या उप्तादनात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे देशाला एवढी निर्यात करणे सहज शक्य असल्याचेही सांगण्यात येत आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती काहीशी अशीच राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
गरीब शेतकरी वीजबिल भरत आहेत, राजकीय वरदहस्त असलेल्यांची वीजबिल भरलेच नाही, वाचा धक्कादायक आकडेवारी
आता पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त उसावर साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय...
ब्रेकिंग! मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा, मात्र कोणाला मिळणार कर्जमाफी? वाचा सरकारचा प्लॅन..
Share your comments