अनेक मुस्लिम धर्मीय राज्यांसह अफगाणिस्तानाला सुद्धा गरिबीचा सामना करावा लागतो. त्यात प्रचंड अशी महागाई आणि अन्नधान्यांची टंचाई सुद्धा या देशासमोरील गंभीर प्रश्न आहे. अशा अफगाणिस्तानला भारताने मोठी मदत केली आहे. भारताने अफगाणिस्तानला ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. पाकिस्तानमार्गे हे गहू अफगाणिस्तानला जाणार आहेत.
ही मदत धान्य परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना झाली. तर या मदतीने अफगाणिस्तानच्या नागरिकांनी देशाचे आभार मानले आहेत. हा गहू पाकिस्तानमार्गे अट्टारी वाघा सीमेवरून अफगाणिस्तानला पाठवण्यात येत आहे. पाठवण्यात आलेल्या गव्हाच्या ट्रकबाबत भारताने ट्रान्झिट सुविधेसाठी विनंती केली होती. त्याचे उत्तर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाकिस्तानने दिले होते.
या पूर्वी सुद्धा भारताने अफगाणिस्तानला जवळपास अडीच टन वैद्यकीय साहित्य आणि कपडे पाठवले होते. तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानातील शीख हिंदूंच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. शिवाय नियमित सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन मोदींनी त्यांना दिले होते. काही दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवतेच्या दृष्टीकोनातून अफगाणिस्तानच्या नागरिकांना मदत करणार असल्याचे जाहीर केले होते.
भारत सरकार मानवतेच्या नात्याने अफगाणिस्तानच्या नागरिकांना धान्य, कोरोना लस आणि इतर औषधे उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.
Share your comments