PM Modi Red Fort Speech 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्राला संबोधित केलं आहे. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अनके विषयांवर प्रकाश टाकला.
१. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
२. 'आज भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय. भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे.
३. 'संपूर्ण गुलामगिरीचा काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. त्याग केला नाही.
४. 'आज आपण सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना, त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे.'
५. नव्या निर्धारानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस आहे.
६. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पहिल्यांदाच देशभरात एवढा मोठा उत्सव साजरा केला जात आहे. मार्च 2022 पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झाली.
७. येत्या काळात आपण 'पंचप्राण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. यामध्ये पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.
८. 'आत्मनिर्भर भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.
९. 'आपण 'डिजिटल इंडिया' उपक्रम पाहत आहोत, देशात स्टार्टअप वाढवत आहेत आणि टियर 2 आणि 3 शहरांमधून भरपूर प्रतिभा समोर येत आहेत.
१०. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, कोणाकडे राहायला जागा नाही आणि तर कुणाकडे चोरीचा माल ठेवायला जागा नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Share your comments