MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

बजेटनंतर खिश्याला लागली गळती ; घरगुती सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे वाढले भाव

बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज सामान्य जनतेला झटका दिला. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. याबरोबर आता स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
बजेटनंतर महागाईचा झटका

बजेटनंतर महागाईचा झटका

बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज सामान्य जनतेला झटका दिला. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. याबरोबर आता  स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, १४.२ किलोचा सिलेंडर २५ रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी या सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली होती.

सिलेंडरच्या किंमतीत केली कपात

१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमत पाच रुपयांनी कपात होऊन तो १४८२.५० रुपयांचा झाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही वाढ

 

पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज याचे दर बदलत असतात. त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत ३५ ते ३७ पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत ३५ ते ३४ पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.

English Summary: Increased prices of domestic cylinders and petrol-diesel Published on: 05 February 2021, 10:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters