साखरेच्या एमएसपीत वाढ ; ऊस उत्पादकांना मिळणार राहिलेली थकबाकी

16 July 2020 08:02 PM By: भरत भास्कर जाधव


ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीत वाढ (किमान समर्थन मूल्य ) करण्याचे ठरवले आहे. सरकारने २ रुपयांनी एमएसपीत वाढ केली असून आता एमएसपी ३३ रुपये झाली आहे. बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या एका गटाने साखरेच्या एमएसपीला २ रुपयांनी वाढविण्यास मान्यता दिली आहे.  या निर्णयामुळे साखर कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होईल, त्यातून ते शेतकऱ्यांची बाकी असलेली देयक बाकी देऊ शकतील.  साखरेचे उत्पादन वर्ष २०१९-२० च्या दरम्यान साखर कारखान्यांकडे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाकी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. 

गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने जीओएम ने बुधवारी साखर कारखान्याचे न्यूनतम किंमत एमएसपी दोन रुपयांनी वाढवून ३३ रुपये प्रति किलोग्रॅम करण्याची विनंती केली. याचा एकच उद्देश आहे की, साधरण २० हजार कोटी रुपयांची अडकलेली देयक रक्कम लवकर दिल्या जाईल. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमन, अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान, केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते. मंत्र्यांच्या गटाने साखर कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या रक्कमेची माहिती घेतली. चालू सत्र २०१९ - २० ऑक्टोबर - सप्टेंबरमध्ये आतापर्यंत २० हजार कोटी रुपये आहे. साखर कारखाने लवकरात लवकर ही देयक रक्कम देतील या गोष्टीवरही या बैठकीत चर्चा झाली. यात एमएसपी वाढविण्याचा मुद्दाही होता, त्यानुसार वाढविण्यात आला.

सूत्रानुसार, मंत्रिमंडळाने खाद्य मंत्रालयाला आदेश दिला आहे की, नीति आयोगाच्या अनुषंगाने साखरेची न्यूनतम किंमत वाढविण्यासह एक मंत्रिमंडळाची सुचना दिली आहे. यात असे म्हटले आहे की, एमएसपीची वाढीने शेतकऱ्याची थकबाकी देता येत नसेल तर सरकार इतर पर्यायाचा विचार करेल. ऊस आणि सारखर उद्योगावर निती आयोग द्वारे स्थापित करण्यात आलेल्या एका समितीने सारखर एमएसपीत वाढ करण्याची मागणी केली होती.  मागील वर्षी यात वाढ केली होती. या किंमतीवर साखर कारखाने ठोक खरेदीदारांना साखर विकते. त्यावेळी एमएसपीला दोन रुपयांनी वाढवून ३१ रुपये प्रति किलो करण्यात आले होते. सरकारी आकड्यानुसार, २०१९--२० सत्र ऑक्टोबर- सप्टेंबरच्या दरम्यान साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून साधरण ७२ हजार कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला. यात साधरण २० हजार कोटी रुपये कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे.

sugarcane producer farmer sugarcane sugar sugar msp home minister Amit Shah union agriculture minister Narendra Singh Tomar finance minister Nirmala Sitharaman sugar factory MSP अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमित शहा गृहमंत्री अमित शहा ऊस उत्पादक शेतकरी एमएसपी साखरेची एमएसपी साखर कारखाना
English Summary: increased in sugar msp ; sugarcane producer farmer can get their money

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.