गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरणकडून सक्तीची वीजवसुली केली जात आहे. असे असताना आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी रोज आंदोलने करत आहेत. शेतकऱ्यांची पिके यामुळे जळू लागली आहेत. यामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहेत. यामुळे आता तरी विजतोडणी थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना आता कृषीपंपाकडील वसुली अदा करुनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच अनेकांना जास्तीची बिले आली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनी वीज वापरली नसताना देखील त्यांना बिले आली आहेत. सध्या रब्बी हंगामातील पीके जोमात असतानाच वीजबिल वसुलीचा तगादा लावला जात आहे. यातूनच वाढीव (Light Bill) वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा आरोप होत आहे. वाढीव बिलामुळे थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होऊन शेती (Crop Damage) पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आता यावर तोडगा काढला जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वीजबिल दुरुस्ती शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्यांच्या अडचणी मांडता येणार असून शेतकऱ्यांच्या समस्यांचा जागेवरच निकाल लावला जाणार आहे. महावितरणकडून या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय या शिबिरात मागील वीजबिलांची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वापर न केलेले अधिकचे वीजबिल शिवाय तीन महिन्याला कृषीपंपाचे बिल देणे बंधनकारक असताना सहा महिन्यातून एकदा तेही वाढीव बिल दिले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी यासारख्या तक्रारींचा निकाल लावला जाणार आहे. या शिबिरादरम्यान ग्राहकांना संगणकीय बिल दिले जाणार आहे तर दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम तात्काळ ग्राहकांना कळवली जाणार आहे. यामुळे ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांना याबाबत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
Share your comments