1. बातम्या

कोरड्या हवामानामुळे वाढली थंडी ; निफाड येथे सर्वात कमी तापमान

राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे, असे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
थंडी वाढली

थंडी वाढली

राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रात  असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे.

सोमवारी निफाड येथे नीचांकी ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दोन दिवसापासून मराठवाडा ते बिहारचा पश्चिम भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा आहे. हा पट्टा  झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भ यादरम्यान असून  समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आगहे. मात्र हा पट्टा फारसा सक्रिय नसल्याने राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडी कमी - अधिक स्वरुपात आहे.

मागील दोन दिवसात किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत होते.परंतु  थंडी वाढल्याने त्यात पुन्हा किमान तापमानात घट झाली आहे.राज्यातील  कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात थंडी असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणात बऱ्यापैकी  थंडी असल्याने किमान तापमान १५ ते १९अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागात चांगलीच थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान जवळपास अंश सेल्सिअसपेक्षा खाली उतरले आहे.तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, भागातही किंचित थंडी आहे.

 

मराठवाड्यात थंडी कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १४ते १८ अंश सेल्सिअसच्या दरमयान आहे.

English Summary: Increased cold due to dry weather, lowest temperature at Nifad Published on: 26 January 2021, 10:57 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters