1. बातम्या

जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचे संयुक्त विदयमाने मौजे तरोडा (ता. परभणी) येथे गुलाबी बोंडअळी निर्मुलन व फरदड मुक्ती यावर 'किसान गोष्टी' कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी संपन्‍न झाला.

KJ Staff
KJ Staff


कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचे संयुक्त विदयमाने मौजे तरोडा (ता. परभणी) येथे गुलाबी बोंडअळी निर्मुलन व फरदड मुक्ती यावर 'किसान गोष्टी' कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी संपन्‍न झाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी परभणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष आळसे होते. यावेळी विस्तार कृषी विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, प्रगतशील शेतकरी श्री. एकनाथराव साळवे, श्री. नरेश शिंदे, श्री. पुरुषोत्त्म शिंदे, श्री. कुलकर्णी, श्री. विठ्ठलराव जवंजाळ, कृषी विभागातील अधिकारी श्री. सुरेश म्हस्के, गंगाखेड तालुका कृषी अधिकारी श्री. भगवान कच्छवे, मंडळ कृषी अधिकारी श्री. संघई, श्री. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपल्‍या मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापसाची पऱ्हाटी कुटटी करुन जमिनीत गाढुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तसेच दिवसेंदिवस जमिनीचा ऱ्हास होत असुन शेतीमधील अवशेष जसे ऊसाची पाचट, कापसाची पऱ्हाटी, तुऱ्हाट्या मोठया प्रमाणात जाळल्या जातात ते न जाळता जमिनीत गाढल्यास सेंद्रिय कर्बात वाढ होऊन कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे सांगितले तसेच पऱ्हाटी उपटुन न काढता जागेवरच यंत्राच्या सहाय्याने कुट्टी करुन जमिनीत मिसळण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

अध्यक्षीय भाषणांत श्री. संतोष आळसे यांनी कपाशी पऱ्हाटी कुट्टी यंत्राचे महत्व सांगुन या यंत्रासाठी शासनाकडुन छोटया शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध असल्‍याचे सांगितले. या यंत्रामधुन पऱ्हाटीची पुर्णपणे कुट्टी होत असल्यामुळे लवकर कुजण्यासाठी मदत होते व दुसरे पिक लगेच घेण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन केले. डॉ. यु. एन. आळसे यांनी कापुस पऱ्हाटी कुट्टी यंत्राचे एकात्मिक किड व्यवस्थापनातील महत्व सांगुन पऱ्हाटी कुट्टी केल्यामुळे एकरी साधारत: 4-5 टन सेंद्रिय खत जमिनीस उपलब्‍ध होऊन त्याचा फायदा जमिन सुधारण्याच्या दृष्टीने होतो असे सांगितले. 

शेतकरी श्री. संजय शेळके यांच्या शेतावर यंत्राव्‍दारे कापसाच्‍या पऱ्हाटीची कुट्टी करण्याचे प्रात्यक्षिक दाख‍वुन मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. प्रभाकर बनसावडे, यांनी केले. सूत्रसंचालन आत्माचे श्री. इक्कर यांनी केले तर आभार श्री. रेंगे यांनी मानले. यावेळी श्री. माने, श्री. कुरूगळ, श्री. गायकवाड, सौ. घोडके आदीसह तरोडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी परभणी येथील रोटोकिंग कंपनी व लक्ष्मी ट्रेडींग कंपनी यांनी सहकार्य केले.

English Summary: Increase the Organic Carbon in soil Published on: 31 December 2019, 05:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters