आपल्याकडील शेतकरी मोठ्या प्रमाणात हंगामी पिके घेतात यामधे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, ऊस, कापूस, मका इत्यादी नगदी आणि रब्बी पिके घेतात तसेच खरीप हंगामामध्ये मूग, मटकी, घेवडा, सोयाबीन ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात परंतु सध्या पीक पद्धती मद्ये मोठा बदल घडून आला आहे. शेतकरी भाजीपाला आणि फळं शेतीकडे वळू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी राज्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती शिवाय भाजीपाल्याच्या भावात सुद्धा प्रचंड वाढ झाली होती परंतु सध्या बाजाराचे चित्र हे बदलले दिसून येत आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगली उघडीप दिली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे परंतु आवक वाढून सुद्धा भाजीपाल्याच्या भावात अजिबात बदल झालेला नाही.
हेही वाचा:- मांस उत्पादनासाठी फायदेशीर अशी माडग्याळ मेंढी, वाचा सविस्तर
आवक वाढून सुद्धा भाजीपाल्याचे भाव हे स्थीरच राहिले आहेत. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने बाजारात भेंडी, गवार, तांबडा भोपळा आणि पालेभाज्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दर काही प्रमाणात वाढले होते. तर बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.
तसेच यामधे फळभाज्या, पालेभाज्या यांचे भाव सुद्धा स्थिर आहेत. पितृपंधरवडा असल्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे शिवाय दरात सुद्धा सुधारणा झाली आहे. पितृपंधरवडा नंतर भाजीपाल्याचे भाव कमी होतील असा अंदाज सुद्धा व्यापारी वर्गाकडून लावण्यात येत आहे.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : ८०-१३०, बटाटा : १८०-२२०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-४००, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान ७५०-८५०, सुरती ३५०-४००, टोमॅटो : १२०-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १४०-१६०, चवळी : ३५०-४००, काकडी : १२०-१४०, कारली : हिरवी २००-२५० पांढरी - २५०-३००, पापडी : ६००-७००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : १००-१२०, वांगी : २००-२५०, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१५०, शेवगा : ६००-७००, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-४००, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१४०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३५०-४००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : ७००-१००० पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : १२०-१४०, कैरी तोतापुरी - ८००-९०० गावरान - ४५०-५००, सुरण : २००-२५०, मका कणीस : १००-१२०, नारळ (शेकडा) : १५००-२०००.
Share your comments