गौण खनिज स्वामित्व धनाच्या व डेड रेंट दरात दीडपट वाढ करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यामुळे वाढलेले दर हे एक जुलै 2021 पासून लागू होतील.या घेतलेल्या निर्णयाची थेट परिणाम हे बांधकाम साहित्य महा गण्यावर होणार आहेत.कोरोना मुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर फार मोठा परिणाम झाला त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी आता गौण खनिजाच्या स्वामित्व धनात दीड पटी पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळावी.
यासाठी राज्य शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये मुद्रांक शुल्क कमी करण्यासह अनेक प्रकारच्या परिणामकारक उपाययोजना केल्या होत्या व त्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले होते. पण आत्ता गौण खनिजाच्या दरात वाढ करण्यात आल्याने बांधकाम साहित्य महागण्याची शक्यता आहे.
बांधकाम क्षेत्रातल्या चुना तयार करण्यासाठी भट्टी मध्ये वापरण्यात येणारे चुनखडी व शिंपल्यांपासून केलेला चुना सहाशे रुपये प्रति ब्रास, दगड आणि दगडाची भुकटी 600 रुपये प्रति ब्रास, जांभा दगड दीडशे रुपये प्रति ब्रास तसेच खडी मुरूम 600 रुपये प्रति ब्रास महाग होईल.
Share your comments