मुख्य पिकांच्या खरीप पेरणी क्षेत्रामध्ये यंदा वाढ

25 June 2020 08:08 AM By: KJ Maharashtra


नवी दिल्ली:
 संपूर्ण देशभरामध्ये दि. 1 जून, 2020 ते 18 जून, 2020 या कालावधीमध्ये 108.3 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या कालावधीत साधारणपणे सरासरी 82.4 मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा जास्त पाऊस पडला आहे. देशभरामध्ये खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून आत्तापर्यंत किती क्षेत्रफळामध्ये कोणत्या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, याची  माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  • भात: खरीप भाताची जवळपास 10.05 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 10.28 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली होती.
  • डाळी: खरीप डाळींची जवळपास 4.58 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 2.22 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये डाळींची पेरणी पूर्ण झाली होती.
  • तृणधान्ये: तृणधान्यांची जवळपास 19.16 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 7.83 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये तृणधान्यांची पेरणी पूर्ण झाली होती.
  • तेलबिया: तेलबियांची जवळपास 14.36 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 1.63 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये तेलबियांची पेरणी पूर्ण झाली होती.
  • ऊस: ऊसाची जवळपास 48.63 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 48.01 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची पेरणी पूर्ण झाली होती.
  • ज्यूट आणि मेस्ता: या पिकाची जवळपास 5.78 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 6.08 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये या पिकाची पेरणी पूर्ण झाली होती.
  • कापूस: कपाशीची जवळपास 28.77 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 18.18 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये या कपाशीची पेरणी पूर्ण झाली होती.

देशभरात दि. 19 जून, 2020 पर्यंत झालेल्या खरीप पेरणीविषयीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.

kharif kharif crops kharif sowing area खरीप पेरणी क्षेत्र खरीप खरीप पिके kharif sowing खरीप पेरणी
English Summary: Increase in kharif sowing area of ​​major crops this year

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.