दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत विकास निधी योजने अंतर्गत व्याज अनुदानात वाढ

20 February 2020 08:02 AM


नवी दिल्ली:
दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत विकास निधी योजने अंतर्गत, वार्षिक 2 टक्क्यांपर्यंतचे व्याज अनुदान वाढवून 2.5 टक्क्यांपर्यंत करण्यासाठीच्या सुधारणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या आर्थिक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत विकास निधीयोजनेसाठी सुधारित व्यय 11,184 कोटी रुपयांचा आहे. 2018-19 ते 2030-31 या काळासाठी 1167 कोटी रुपयांचे व्याज अनुदान डीएएचडी कडून दिले जाईल. तर 8,004 कोटी रुपयांच्या कर्जासाठी नाबार्ड योगदान देईल. 12 कोटी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ संयुक्तपणे देणार आहेत.

दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत विकास निधी अंतर्गत, केंद्र सरकार, 2019 -20 पासून ते 2030-31 पर्यंत नाबार्डला 2.5 टक्क्यांपर्यंत व्याज अनुदान उपलब्ध करून देईल. दुध संघाना कमी दरात निधी पुरवता यावा यासाठी बाजारातल्या कमी दराचा लाभ घेण्याच्या दृष्टीने नाबार्ड, कर्जासाठी आपली  स्वतःची रणनीती ठेवेल.

प्रभाव

  • 50 हजार गावातल्या 95 लाख दुध उत्पादकांना लाभ मिळेल.
  • 126 लाख लिटर प्रतिदिन दुध प्रक्रिया क्षमता आधुनिकीकरण, विस्तार आणि निर्मिती
  • दुधभेसळ तपासण्यासाठी 28,000 दुध तपासणी उपकरणे उपलब्ध होणार.

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ नरेंद्र मोदी नाबार्ड NABARD narendra modi National Dairy Development Board National Cooperative Development Corporation
English Summary: Increase in interest subsidy under the Milk Processing and Infrastructure Development Fund Scheme

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.