शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच तुरीच्या हमीभावात ४०० रूपयांची वाढ करून तो ७००० रूपये करण्यात आला. मोदी सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) ६४० रुपयांची वाढ केली.
तसेच तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ८०५ रुपयांची तर मुगाच्या हमीभावात ८०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
निंबोळी अर्क कसा तयार करावा? निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या मार्गावर...
केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी सरकारला सादर केल्या. दरम्यान, पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा देऊन हमीभाव निश्चित करण्यात आले, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
शेती नाही, कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, लाखात आहे पगार, जाणून घ्या..
बाजरीला उत्पादनखर्चापेक्षा सर्वाधिक ८२ टक्के अधिक हमीभाव देण्यात आला. तसेच तुरीसाठी उत्पादन खर्चावर ५८ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला, असेही गोयल यांनी सांगितले.
जंगल वृद्धीसाठी सीडबॉल निर्मिती कार्यशाळा
आता शेतातील स्टार्टर चोरीची चिंताच मिटली, तरुणाने शोधला कायमचा उपाय...
तुम्ही कधी पांढरा आंबा पाहिला आहे का, जगातील सर्वात अनोखा वाणी आंबा, जाणून घ्या...
Share your comments