1. बातम्या

पीक पेरणीत वाढ; मागील वर्षाच्या तुलनेत पेरा ५९ लाख हेक्टरने जास्त

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


यंदा यावर्षी मॉन्सून चांगला बरसला आहे, याचाच परिणाम खरिपातील पेरा वाढला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पिकांची पेरणी ही ५९ लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे. हवामान विभागानुसार, यावर्षी १० सप्टेंबरपर्यंत चालू मॉन्सून सत्रात ८२६.६ मिमी पाऊस झाला. दरम्यान आतापर्यंत देशात साधरण ७७८.३ मिमी पाऊस होत असतो. चांगला पाऊस झाल्याने याचा फायदा हा खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, मागील वर्षी या काळात १०४५.१८ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी ११०४.५४  लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची  पेरणी झाली होती. दरम्यान अजून धानाची पेरणी अजून चालू असल्याचे सांगितले जात आहे.

डाळी, धान्य आणि तेलबियांची पेरणी झाली आहे. दरम्यान खरीप हंगामातील पेरणीची अंतिम आकडे ऑक्टोबर २०२० मध्ये येतील अशी आशा आहे. भाताची मागील वर्षी या वेळापर्यंत ३७३.८७ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी ४०२.२५ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. म्हणजेच भाताच्या पेरणीत ७.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाळवर्गीय पिकांची पेरणी मागील वर्षात १३१.७६ लाख हेक्टर परिसराच्या तुलनेत यंदा १३७.८७ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. म्हणजेच ४.६४ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे.

तेलबियाची मागील वर्षी  १७६.९१ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी १९५.९९ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे. म्हणजेच तेलबियांचा पेरणीत क्षेत्रात १०.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ऊसाच्या पेरणीत मागील वर्षी ५१.७५ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी ५२.४६ लाख हेक्टर परिसरात पेरणी झाली आहे. म्हणजेच पेरणी क्षेत्रात १.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कापूसची मागील वर्षी १२६.६१ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी १२९.३० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची शेती करण्यात आली आहे. म्हणजेच यात २.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters