नवी दिल्ली: देशातल्या दुध उत्पादनात 36.35 टक्के वाढ झाली असल्याचे केंद्रीय दुग्धविकास, मत्स्योत्पादन आणि पशुविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय दुध दिवसानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2013-14 मध्ये दुग्ध उत्पादनाचे प्रमाण 137.7 दशलक्ष टन होते. 2018-19 मध्ये ते 187.75 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.

त्याचप्रमाणे दुधाच्या दरडोई उपलब्धतेतही वाढ झाली असल्याचे सिंह यांनी सांगितले. 2013-14 मध्ये हे प्रमाण 307 ग्रॅम होते ते 2018-19 मध्ये 394 ग्रॅमवर पोहोचले आहे. दुग्ध उत्पादनाचा वार्षिक विकासदर 2009 ते 2014 या कालावधीत 4.2 टक्के होता. तो 2014-19 या कालावधीत वाढून 6.4 टक्क्यांवर पोहोचला. आरसेपमध्ये सहभागी होण्यास नकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 10 कोटी शेतकऱ्यांचे हित जपले आहे, असे सांगून सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
English Summary: Increase 36.35 percent milk production in indiaPublished on: 27 November 2019, 01:11 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments