काळाच्या ओघातपारंपरिक पिकांची जागा नवनवीन पिके घेत आहेत. हीच गोष्ट मिरची च्या बाबतीत देखील घडली आहे. काळानुरूप मिरचीचे वाण देखील बदलले असून आता पारंपारिक मिरचीची जागा आता तेजा मिरचीने घेतलेली आहे.
देशातील चौथ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ असलेल्या नंदुरबार मध्ये मिरचीला योग्य दर मिळत असल्याने आवक देखील सुधारत आहे. सध्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती लगतच्या तब्बल 200 एकरामध्ये लाल मिरचीचे पखरण असून मिरची वाळवण्यासाठी ठेवण्यात आली असून याच परिसरात मिरची खुडण्याचे कामही केले जात आहे.
शंकेश्वरी मिरची च्या जागेवर तेजामिरची
जर नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर तिथे शंकेश्वर जातीच्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते
मात्र यामध्ये आता बदल होत असून या मिरचीचे उत्पादन घटत असल्याने आता जिल्ह्यात त्याच्या, अरुणिम, कळस इत्यादी वानांच्या मिरचीची लागवड केली जात आहे. आतापर्यंत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार पेठेत एक लाख 50 हजार क्विंटल मिरचीची आवक झालेली असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. नंदुरबार जिल्हा गुजरात आणि इतर राज्यांच्या सीमेलगत असून इतर राज्यातून देखील मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
लाल मिरचीला प्रति क्विंटल तीन हजार 500 पेक्षा अधिक चा भाव मिळत आहे. नंदुरबार भागातील मिरची हि रंग आणि चवी सोबत गंधासाठी ही प्रसिद्ध आहे. मिरची हंगामाची सुरुवात झाल्यापासून आवक मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु एकदाही भाव कमी झाले नसल्याने नंदुरबार बाजारपेठेकडे शेतकरी आकर्षित होत आहेत.
Share your comments