महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ व मराठवाडा मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड शेतकरी करतात व हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला व यामागे बरीचशी कारणे होती.
यावर्षी देखील कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये जास्त पाऊस होऊन कपाशी पिकाला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.
या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी येत असून पंजाब व हरियाणा नंतर आता गुजरात राज्यात देखील नवीन कापसाची आवक सुरू झाली असून या ठिकाणी नवीन कापसाला अकरा हजार ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. परंतु भविष्याची कापूस दराची स्थिती कशी राहील याबाबत जाणकारांचे म्हणणे आहे की बाजाराची स्थितीचा विचार केला तर कापसाचे भाव येणार्या भविष्यकाळात देखील तेजीतच राहतील.
नक्की वाचा:Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...
गुजरात राज्यातील राजकोट आणि अमरेली तसेच गोंडल या बाजारांमध्ये नव्या हंगामातील कापसाचे लीलाव पार पडले व या दरम्यान कापसाला जुन्या कापसा इतकाच प्रतिक्विंटल बारा हजार रुपये दर मिळाला. राजकोट बाजारामध्ये देखील कापसाला 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
परंतु आता येणाऱ्या काळात आवक जेव्हा वाढेल तेव्हा बाजाराचे परिस्थिती काय राहील व त्या नंतरच कापसाच्या भावाचा अंदाज बांधता येईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Share your comments