पुणे
पुणे मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे आज (दि.१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले आहे. फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल या मार्गिकेवरील मेट्रोचे लोकार्पण संपन्न झाले आहे. पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडण्यासाठी या मार्गिका महत्त्वाच्या मानल्या जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत मेट्रोचे लोकार्पण संपन्न झाले. लोकार्पणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या मेट्रोमुळे पुणेकरांना मोठा फायदा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या मेट्रोमुळे पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे सहज सोपे होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असून कमाल भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल.
तसंच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत असणार आहे. शनिवार आणि रविवार सर्व नागरिकांसाठी मेट्रोच्या दरात ३० टक्के सवलत असणार आहे. तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे.
Share your comments